पिंपळगावला ‘शंभो शंकरा’चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:21 IST2020-02-21T23:33:27+5:302020-02-22T01:21:04+5:30

पिंपळगाव बसवंत परिसरात सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्र म पार पडले. शहरभरातील शिव मंदिरांमध्ये ‘शंभो शंकरा’चा गजर निनादला. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. तसेच कावड मिरवणूक आकर्षण ठरले. तसेच गंगाजलाने शिवलिंगांचा अभिषेक करण्यात आला.

Pimpalgaon 'Shambho Shankara' alarm | पिंपळगावला ‘शंभो शंकरा’चा गजर

महाशिवरात्री निमित्ताने जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने अंबिकानगर येथून काढण्यात आलेली कावड मिरवणूक.

ठळक मुद्देभाविकांचा उत्साह : महाशिवरात्रीनिमित्त कावड मिरवणूक

पिंपळगाव बसवंत : परिसरात सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्र म पार पडले. शहरभरातील शिव मंदिरांमध्ये ‘शंभो शंकरा’चा गजर निनादला. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. तसेच कावड मिरवणूक आकर्षण ठरले. तसेच गंगाजलाने शिवलिंगांचा अभिषेक करण्यात आला.
येथील गोपाळबाबा महादेव मंदिर, अंबिकानगर येथील जनेश्वर महादेव मंदिर व महादेववाडीनगर येथील शंभू महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. प्रारंभी नाशिक गोदावरीहून काही भाविकांनी पायी कावड आणलेली होती. त्याची शहरातून ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. जय बाबाजी भक्त परिवाराचे मार्गदर्शक रामराव डेरे, मनोज शेवरे, मच्छिंद्र खोडे, नाना कुमावत, जगदीश वायकांडे, अक्षय विधाते, पुंडलिक मेधणे, गणेश गायकवाड, हनुमंत शेवरे, विजय जाधव, नाना बनकर, शरद शेखरे, लखन शिंदे, शरद बुचकूल आदींसह शेकडो शिवभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते.
महाशिवरात्रीनिमित्त शहरातील गोपाळबाबा मंदिर व जनेश्वर महादेव मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. बेल पाने व शिवलिंगाचे गंगाजल अभिषेक करून सत्यनारायण पूजा करून महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.

Web Title: Pimpalgaon 'Shambho Shankara' alarm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.