पिंपळगाव खांब रस्त्याचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 23:02 IST2020-06-25T23:01:20+5:302020-06-25T23:02:14+5:30

इंदिरानगर : ‘पिंपळगाव खांब रस्ता चिखलात रुतला’ या लोकमत वृत्ताची दखल घेत तातडीने महापालिकेच्या वतीने रस्त्याचे खडीकरण करण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Pimpalgaon Khamb road work started | पिंपळगाव खांब रस्त्याचे काम सुरु

पिंपळगाव खांब रस्त्याचे काम सुरु

ठळक मुद्देनागरिकांत समाधान : ठिकठिकाणी होता चिखल

इंदिरानगर : ‘पिंपळगाव खांब रस्ता चिखलात रुतला’ या लोकमत वृत्ताची दखल घेत तातडीने महापालिकेच्या वतीने रस्त्याचे खडीकरण करण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब रस्ता पहिल्याच पावसात पाहून गेल्याने संपूर्ण रस्ता चिखलात रु तला असून, गावातील नागरिकांना व वाहनधारकांना चिखल तुडवत मार्गक्र मण करावे लागत होते. या दीड वर्षापूर्वी पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव काम या रस्त्याचे खोदकाम करून भूमीत गटारीचे पाइपलाइन टाकण्यात आले होते. रस्ता थातूरमातूर पद्धतीने बुजविण्यात आला. पावसामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाची डबके व चिखल झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांना शहरात ये-जा करण्यासाठी चिखल तुडवत आणि पाण्याचे डबके चुकवत वाहनधारकांना मार्गक्रमण करावे लागत होते.गेल्या वर्षी पावसाळ्यात तसेच यंदाही पहिल्या पावसात पिंपळगाव खांब ते पिंपळगाव फाटा चिखलात रु तला होता. या समस्येला ‘लोकमत’ने वाचा फोडल्याने रस्त्याचे खडी करण्याच्या कामास सुरु वात झाल्याने समाधान वाटत आहे.
- सोमनाथ बोराडे, ग्रामस्थ

Web Title: Pimpalgaon Khamb road work started