शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पिंपळगाव- घोटी-भंडारदरा रस्ता खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 7:00 PM

नाशिक व अहमदनगर जिल्ह्याला जोडणारा घोटी-पिंपळगाव मोर-भंडारदरा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

सर्वतीर्थ टाकेद : नाशिक व अहमदनगर जिल्ह्याला जोडणारा घोटी-पिंपळगाव मोर-भंडारदरा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. राज्यातील सर्वोच्च शिखर कळसूबाई, हरिश्चंद्र गड, किल्ले विश्रामगड, सर्वतीर्थ टाकेद, रतनगड, किल्ले कलंग, अदन, मदन, उलंग, रंध्रा फॉल, घोरपडादेवी, भंडारदरा धरण येथे जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा असून, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यावरणप्रेमी व पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.त्यात घोटी-सिन्नर महामार्गाची चाळण झाली असून, घोटी-भंडारदरा रस्त्यावरील प्रवास प्रवासी व वाहनचालकांना मोठी डोकेदुखी ठरत आहे. पिंपळगाव मोरपासून ते धामणीची वाडी-परदेशवाडी-वासाळी फाटा ते बारीपर्यंत रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडला आहे.इगतपुरी, घोटीसह परिसरातील एकमेव बाजारपेठ असलेल्या तीर्थक्षेत्र सर्वतीर्थ टाकेद या ठिकाणी येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना, व्यापारी-दुकानदारांसह पर्यटक व भाविकांना याच रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात घडत आहे. गरोदर महिला, रुग्णांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे. डांबर उखडले गेल्याने माती व धुळीचा सामना करावा लागतो आहे. रस्ता कधी दुरुस्त होणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकroad transportरस्ते वाहतूक