पिंपळगाव बसवंतला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:18 IST2020-04-23T21:04:13+5:302020-04-24T00:18:40+5:30
पिंपळगाव बसवंत : गेल्या महिनाभरापासून असलेले लॉकडाउन व संचारबंदी सोमवारी (दि.२०) थोड्या प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने तालुक्यात रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची गर्दी उसळली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाच उडाल्याचे चित्र दिसून आले.

पिंपळगाव बसवंतला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
गणेश शेवरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत : गेल्या महिनाभरापासून असलेले लॉकडाउन व संचारबंदी सोमवारी (दि.२०) थोड्या प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने तालुक्यात रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची गर्दी उसळली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाच उडाल्याचे चित्र दिसून आले.
प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित भागात काही कंपन्या, बांधकाम कृषीविषयक आस्थापना खुल्या करण्यास शासनाने हिरवा कंदील दिल्याने तसेच शासकीय कार्यालयां- मधील दहा टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आल्याने मरगळ झटकत कामावर निघालेल्या कामगार वर्गाची रस्त्यावरील गर्दी नियंत्रणात आणण्यात पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. या कालावधीत जीवनाश्यक वस्तू, औषधे, दवाखाने वगळता सर्व आस्थापना उद्योग बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने संपूर्ण बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. कोरोनाचा पादुर्भाव वाढतच असल्याने शासनाने पुन्हा लॉकडाउनचा कालावधी वाढविला, मात्र यामुळे शासनाचा आर्थिक महसूल बंद झाल्याने शासनाच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने शहरात काही ठिकाणी गर्दी दिसून आली.