पिंपळगाव बसवंतला आगीत तिघांचा मृत्यू

By Admin | Updated: November 3, 2016 23:09 IST2016-11-03T23:08:01+5:302016-11-03T23:09:30+5:30

पिंपळगाव बसवंतला आगीत तिघांचा मृत्यू

Pimpalgaon Baswant has died in the fire | पिंपळगाव बसवंतला आगीत तिघांचा मृत्यू

पिंपळगाव बसवंतला आगीत तिघांचा मृत्यू

पिंपळगाव बसवंत : येथील पवनसुतनगर झोपडपट्टीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या आगीत चार झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.
येथील नारायणटेंभी रोडवरील पवनसुतनगर झोपडपट्टीत सुमारे १५० झोपड्या आहेत. येथे राहणारे भाऊसाहेब बाबूराव पवार यांच्या घरात सायंकाळी ६.३० वाजेदरम्यान सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने मोठा स्फोट होऊन आग लागली. आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले.
या आगीत भाऊसाहेब बाबूराव पवार (३६), रोहन शरद शिंदे (७), मोतीराम हरी लिलके (५५), सोमनाथ हरी लिलके (५७) हे गंभीर भाजले असून, त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. पवनसुतनगर येथे सुमारे १५० झोपड्या आहेत. पिंपळगाव बसवंत अग्निशामक दल तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत बाळू मोतीराम पवार, मोतीराम हरी लिलके यांच्या घरांचा संपूर्ण कोळसा झाला आहे. (वार्ताहर)आगीत मोहिनी भाऊसाहेब पवार (३१), करण कृष्णा वळवी (८) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर जखमी झालेल्या रोहिणी शरद (४) हिला नाशिक येथे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

Web Title: Pimpalgaon Baswant has died in the fire