पिंपळगाव बसवंत येथे मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 14:19 IST2018-02-14T14:19:03+5:302018-02-14T14:19:27+5:30
पिंपळगाव बसवंत : एका सॅन्ट्रो गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी सुमारे पन्नास हजार रु पये किंमतीचा मद्यसाठा जप्त केला.

पिंपळगाव बसवंत येथे मद्यसाठा जप्त
पिंपळगाव बसवंत : एका सॅन्ट्रो गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी सुमारे पन्नास हजार रु पये किंमतीचा मद्यसाठा जप्त केला.
पिंपळगाव बसवंत येथील ढाब्यावर देशी, विदेशी मद्य पुरवठा करण्यासाठी दिंडोरीहुन ऊंबरखेड या मार्गाने सेन्ट्रो गाडी नंबर एमएच ०४- बीक्यू ३१२५ येत असल्याचे कळाले. त्यानंतर सदर गाडीत मद्य असल्यामुळे वाहन चालक समीर पठाण हा हा अत्यंत वेगाने गाडी चालवत असल्याचे पोलीसाना कळविण्यात आले. पोलिस कॉन्टेबल रवी बाºहाते, रविद्र चिणे, पप्पु देवरे, एस.पी.पाटील दोन मोटरसायकलवर सदर गाडीचा पाठलाग केला. पंधरा ते विस किलोमिटर कच्या रस्त्याने हा थरार सुरू होता. उंंबरखेड परिसरातील शेतकरी वर्गाला नेमके काय चालु आहे याची कुणकुण लागुन होती. याच वेळी समोरून देवदर्शनासाठी जाणारे नितीन यादव थेटे यांची ईको स्पोर्ट हे फॅमीली सह चालले होते. दैव बलवत्तर म्हणून समोरा समोर धडक टळली. रस्ता लहान असल्याने सेन्ट्रो गाडी सोडुन चालक समीर पठाणने शेतातुन पळ काढला, मात्र चारही पोलिसांनी सापळा रचत शेतातून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी पन्नास हजारांचा मद्यसाठा व गाडी असा एक लाख पन्नास हजाराचा मुद्दमाल जमा करत कार्यवाही केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज बोरळे, राहुल मोरे, घुगे, दुर्गेश बैरागी, पाटोळे दवंगे करीत आहेत.