शिंदे यांच्या समर्थनार्थ पिंपळगावी बॅनरबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 23:59 IST2022-06-25T23:59:10+5:302022-06-25T23:59:37+5:30
पिंपळगाव बसवंत : ह्यसर्वसामान्यांचा पाठीवरचा हात एकनाथह्ण या वाक्याखाली पिंपळगाव बसवंत शहरातील केंद्रबिंदू असणाऱ्या निफाड फाट्यावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दर्शवणारा फलक झळकला आहे.

शिंदे यांच्या समर्थनार्थ पिंपळगावी बॅनरबाजी
ठळक मुद्देया बॅनरमुळे शहरात राजकीय चर्चेला उधाण
पिंपळगाव बसवंत : ह्यसर्वसामान्यांचा पाठीवरचा हात एकनाथह्ण या वाक्याखाली पिंपळगाव बसवंत शहरातील केंद्रबिंदू असणाऱ्या निफाड फाट्यावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दर्शवणारा फलक झळकला आहे.
शहरातील युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुजित मोरे यांच्या राजे ग्रुपतर्फे हा बॅनर लावले आहे. पिंपळगाव शहरात सेनेत दोन गट निर्माण झाले असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
या बॅनरवर इतर सर्व शिवसेना नेत्यांचे फोटो वगळून फक्त हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे या दोघांचे फोटो लावण्यात आले आहे. या बॅनरमुळे शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.