शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

स्वार्थीपणामुळे संस्कृतीचे चित्र बिघडले : अनिल अवचट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:50 AM

स्वत:च्या फायद्या-तोट्याच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार म्हणजे आपली संस्कृती असून, आजच्या स्थितीत समाजातील मोठा वर्ग स्वत:पुरता केंद्रित होऊन स्वत:च्या फायद्याचा विचार करू लागल्याने आज सर्वत्र संस्कृतीचे चित्र बिघडलेले दिसत असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केली.

नाशिक : स्वत:च्या फायद्या-तोट्याच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार म्हणजे आपली संस्कृती असून, आजच्या स्थितीत समाजातील मोठा वर्ग स्वत:पुरता केंद्रित होऊन स्वत:च्या फायद्याचा विचार करू लागल्याने आज सर्वत्र संस्कृतीचे चित्र बिघडलेले दिसत असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केली.भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त परशुराम साईखेडकर नाट्यगृहात बुधवारी (दि.१७) तीनदिवसीय व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ‘बदलती संस्कृती’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नामकोचे चेअरमन सोहनलाल भंडारी यांच्यासह व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील बुरड, राजू धाडीवाल, यतीश डुंगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. अनिल अवचट म्हणाले, जात, धर्म, संस्कृतीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची जीवन जगण्याची पद्धत वेगवेगळी असते. पूर्वी जमिनीला आईसमान मानले जात, परंतु आता जमिनीला किती पैशाचे मोल आहे याचाच विचार केला जातो. मात्र, माणूस दिवसेंदिवस एकाकी जीवनाक डे वळतो आहे. सर्वांनी या स्थितीतून बाहेर पडून ‘वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड परायी जाणे रे’ या पंक्तीप्रमाणे समाजातील अनाथ, वेश्या, दुर्बल यांसारख्या वंचित घटकांसाठी सेवाभावनेने काम करण्याजी गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.निसर्ग संवर्धनाचे आवाहनवाढत्या शहरीकरणातून निर्माण झालेल्या एकाकीपणाचे दुष्परिणाम सांगतानाच पूर्वीची विकेंद्रित जीवनशैली पर्यावरण संवर्धन करणारी असल्याचे डॉ. अनिल अवचट यांनी अधोरेखित केले. परंतु, वसाहतवादी ब्रिटिशांनी पर्यावरणाचा ºहास सुरू केला असून, तो आजही सुरू आहे. देशाची संपत्ती लुटण्यासाठी बनविलेली केंद्रे इंग्रजांनंतरही आपल्या सत्ताधाऱ्यांनी कायम ठेवल्याने त्याचे शहरात रूपांतर होऊन कचरा, सांडपाणी व प्रदूषणाच्या समस्या निर्माण झाल्याचे सांगताना सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. अवचट यांनी केले.

टॅग्स :Anil Avchatअनिल अवचटcultureसांस्कृतिक