शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

शहरात सुमारे नऊशे ठिकाणी पिकअप शेडचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:06 IST

महापालिकेने बससेवा ताब्यात घेण्याची जय्यत तयारी सुरू केली असून, शहरातील विविध भागांत चारशेहून अधिक मार्गांवर ही सेवा देण्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याशिवाय पीपीपीच्या माध्यमातून किमान ९०० पिकअप शेड उभारण्यात येत आहे. याशिवाय डेपोसाठी काही जागांचादेखील शोध सुरू आहे.

नाशिक : महापालिकेने बससेवा ताब्यात घेण्याची जय्यत तयारी सुरू केली असून, शहरातील विविध भागांत चारशेहून अधिक मार्गांवर ही सेवा देण्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याशिवाय पीपीपीच्या माध्यमातून किमान ९०० पिकअप शेड उभारण्यात येत आहे. याशिवाय डेपोसाठी काही जागांचादेखील शोध सुरू आहे.  महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक ताब्यात घेण्यावर गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर महासभेचा ठराव अद्याप प्रशासनाला प्राप्त झाला नसला तरी बससेवेची तयारी मात्र वेगाने सुरू आहे. एका खासगी संस्थेमार्फत आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसमवेत घेऊन शहराच्या प्रमुख भागात सर्र्वेक्षण करण्यात येत आहेत. शहराच्या विविध भागांतील चारशे प्रमुख मार्ग निश्चित करण्यात आले असून, आणखी काही मार्ग निश्चित होण्याची शक्यता आहे.  महापालिका हद्दीतील विविध मार्गांवरील ९०० जागा पिकअप शेडसाठी निश्चित करण्यात आल्याचेदेखील वृत्त आहे.  पीपीपी अंतर्गत खासगीकरणातून हे पिकअप शेड विकसित करण्यात येणार आहेत. पिकअप शेडवर जाहिराती लावून त्या माध्यमातून उत्पन्न विकासक घेणार आहे. पिकशेडवर बसच्या आगमनाची रियल टाइम व्यवस्थादेखील असणार आहे. त्यामुळे बस नेमकी केव्हा येईल याची माहिती उपलब्ध होणार आहे.ठरावाची प्रतीक्षामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन समिती ऐवजी कंपनी स्थापन करण्यास परवानगी दिली असली तरी महासभेत समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. तो बदलून देण्याबाबत भाजपातच दोन गट पडले आहेत. महापौरांनी महासभेत निर्णय दिल्यानंतर त्यात ठराव करताना बदल करणे योग्य ठरणार नाही, असे काहींचे मत आहे तर आयुक्तांना कंपनी स्थापन करण्याबाबत फेरप्रस्ताव सादर करण्यास सांगावे आणि आगामी महासभेत त्याला परवानगी द्यावी, अशी काही नगरसेवकांची मागणी आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.दोनशे बस सीएनजीवर चालणारमहापालिकेच्या मूळ प्रस्तावानुसार ठेकेदाराला दोनशे बस इलेक्ट्रिक, तर दोनशे डिझेल बस घ्याव्या लागणार होत्या. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार त्यात बदल करण्यात आला असून, आता डिझेलऐवजी सीएनजी बस घेण्याची अट ठेकेदाराला टाकण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक