चांदवडला फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:29 IST2020-06-17T22:14:03+5:302020-06-18T00:29:32+5:30
चांदवड : शहरातील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या शाखेत तालुक्यातील अनेक गावांतील ग्राहक येत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे.

चांदवडला फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा !
चांदवड : शहरातील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या शाखेत तालुक्यातील अनेक गावांतील ग्राहक येत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे. बॅँकेची शाखा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने तालुक्यातून येणाऱ्या ग्राहकांमुळे कोरोना संसर्गाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बॅँक व्यवस्थापनाने काळजी घेणे गरजेचे असून, डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
बॅँक कार्यालयात एकाच वेळी तीन व्यक्तींना सोडल्यास वेगवेगळे व्यवहार त्यात आरटीजीएस, पैसे काढणे, पैसे भरणे, कृषी पीक कर्ज विचारपूस आदी कामे ग्राहक विभक्तपणे करू शकतील. बॅँकेने ग्राहक सेवेत सुधारणा घडवून आणावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.