‘फडणीस’ संचालकांवर दोन गुन्हे दाखल ११ लाख ९२ हजारांच्या गुंतवणुकीचा अपहार
By Admin | Updated: March 23, 2017 21:19 IST2017-03-23T21:19:19+5:302017-03-23T21:19:19+5:30
जासह गुंतविलेली रक्कम परत दिली नसल्याने फौजदारी कायद्यान्वये न्यायालयाच्या आदेशाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांवर दोन गुन्हे

‘फडणीस’ संचालकांवर दोन गुन्हे दाखल ११ लाख ९२ हजारांच्या गुंतवणुकीचा अपहार
नाशिक : ठेवींवर जादा दराचे आमिष दाखवून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेत कालावधी पूर्ण होऊनही व्याजासह गुंतविलेली रक्कम परत दिली नसल्याने फौजदारी कायद्यान्वये न्यायालयाच्या आदेशाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्हा न्यायालयात अर्जदार शशांक बाळकृ ष्ण कुलकर्णी, सीमा शशांक कुलकर्णी यांनी फौजदारी अर्ज दाखल केला होता. या अर्जानुसार न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्याने पोलिसांनी फडणीस संचालकांवर फिर्यादींच्या तक्रारीनुसार व न्यायालयीन आदेशानुसार गुन्हे दाखल केले आहेत. फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा अध्यक्ष संशयित विनय प्रभाकर फडणीस यासह संचालक भाग्यश्री सचिन गुरव, शरयू विनायक ठाकर, सायली विनय फडणीस, अनुराधा विनय फडणीस (सर्व रा. कल्पवृक्ष, कर्वेनगर, पुणे) यांनी फिर्यादींच्या राहत्या घरी निसर्ग, साईनगर, दिंडोरीरोड येथे विश्वास संपादन करून जादा व्याजदराचे आमिष दाखवत प्रत्येकी अनुक्रमे ४ लाख ९२ हजार ४४४ व ७ लाख ३ हजार ४९१ रुपयांची रक्कम ठेव म्हणून २०१३ साली गुंतविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ठेवींची मुदत पूर्ण होऊनदेखील संबंधितांनी व्याजासह रक्कम परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हांडोरे करीत आहेत.