शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

नाशकात पेट्रोल दरवाढीचा उच्चांक; असे कसे अच्छे दिन? संतप्त सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 16:16 IST

रविवारी सकाळपासून शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या अत्यंत कमी प्रमाणात दिसून आली. सुटीचा आनंद घेण्यसाठी नाशिककर घराबाहेर अपवादानेच पडले. पेट्रोल दरवाढीने रविवारी उच्चांक गाठला होता. ८८.३६ रुपये दराने शहरातील पेट्रोल पंपावरून पेट्रोलविक्री होत होती.

ठळक मुद्दे भाजपा सरकारने दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न भंगले

नाशिक : एकीकडे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर वाढत असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचीही दरवाढ सातत्याने केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा ‘चटका’ बसत आहे. सत्तेत येण्याअगोदर भाजपा सरकारने दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न भंगले असून, रविवारी (दि.९) पेट्रोल प्रति लिटर ८८.३६ पैसे इतके झाले. दरवाढीचा हा अद्यापपर्यंतचा उच्चांक नोंदविला गेला. त्यामुळे भाजपाचे असे कसे अच्छे दिन? असा संतप्त सवाल नाशिकरांनी उपस्थित केला आहे.देशभरात इंधनदरवाढीने नागरिक त्रस्त झाले असून, सर्वच विरोधी पक्ष इंधनदरवाढीविरोधात एकवटले आहे. विरोधी पक्षांनी सोमवारी (दि.१०) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या हाकेला सर्वपक्षीय धार मिळाली असून, प्रवासी वाहतूकदारसंघटनाही या बंदमध्ये सहभागी होण्याची चिन्हे आहेत. इंधनदरवाढीमुळे सर्वच क्षेत्रात महागाई चक्रकार पद्धतीने झिरपत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपा सरकारविरुद्ध रोष तीव्र होऊ लागला आहे. सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाली असून, सरकारने देशभरात इंधनाच्या दरावर त्वरित नियंत्रण मिळविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकूणच नागरिकांच्या वाढत्या रोषाबरोबरच या सरकारला विरोधी पक्षांच्या विरोधालाही सामोरे जावे लागत आहे.

रविवारी सकाळपासून शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या अत्यंत कमी प्रमाणात दिसून आली. सुटीचा आनंद घेण्यसाठी नाशिककर घराबाहेर अपवादानेच पडले. पेट्रोल दरवाढीने रविवारी उच्चांक गाठला होता. ८८.३६ रुपये दराने शहरातील पेट्रोल पंपावरून पेट्रोलविक्री होत होती. तसेच पॉवर पेट्रोलचे दर ९१.१८ रुपयांवर पोहचले होते, तर डिझेलचे दर ७६.३५ रुपयांवर पोहचले होते. डिझेल दरवाढीचाही हा उच्चांक ठरला. आतापर्यंत डिझेलचे दर चालू आठवड्यात ७४ रुपये प्रतिलिटरच्या जवळपास स्थिरावत होते; मात्र रविवारी थेट ७६ रुपयांच्या पुढे दर गेल्याने मालवाहू वाहनांसह काही कौटुबिंक मोटारचालकांनीही नाराजी व्यक्त केली. परिणामी नागरिकांनी गरजेपुरतेच घराबाहेर पडणे रविवारी पसंत केले. 

इंधनदरवाढीचा साप्ताहिक आढावा. (दर प्र.लिटर)    

दिनांकपेट्रोलडिझेलपॉवर पेट्रोल टर्बो डिझेल
१ सप्टें.८६.५४७४.०६ ८९.३६      ७७. २७
२ सप्टें. ८६.७१७४.४२८९.८५  

७८. ०५

३ सप्टें.८७.०३७४.८४ ८९.८५     ७८. ०६
४ सप्टें.८७.१९७५.०४ ९०.०१ ७८.२५
५ सप्टें. ८७.१९७५.०४ ९०.०१     ७८.२५
६ सप्टें.८७.३८७५.२५ ९०.२०    ७८.४७
७ सप्टें . ८७.८६७५.७९ ९०.६७   ७९.००
८ सप्टें.८८.२४७६.२५९१.०६        ७९.४६
९ सप्टें. ८८.३६७६.२५ ९१.१८७९.५६
     

   

टॅग्स :NashikनाशिकPetrolपेट्रोलBJPभाजपाGovernmentसरकार