शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

पेठचा दुर्गम धानपाडा स्वच्छ आदिवासी पाडा; सरपंच रमेश यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 18:15 IST

धानपाडा या लहानशा आदिवासी पाड्यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दरोडे यांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यापुर्वी त्यांनी पाड्यावर कचरा टाकायचा कोठे? या प्रश्नाचे उत्तर शोधत ठिकठिकाणी क चरा कुंड्या बसविल्या.

ठळक मुद्देपाड्यावर ३२९ वैयक्तिक शौचालय उभारले. गाव १०० टक्के हगणदारीमुक्त केले.

नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत पेठ तालुक्यातील धानपाड्याचे सरपंच रमेश दरोडे यांनी आपले गाव शंभर टक्के हगणदारीमुक्त करत स्वच्छ आदिवासी पाडा बनविला. यासाठी त्यांना ‘स्वच्छता ’ या गटात पुरस्काराने गौरविण्यात आले.धानपाडा या लहानशा आदिवासी पाड्यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दरोडे यांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यापुर्वी त्यांनी पाड्यावर कचरा टाकायचा कोठे? या प्रश्नाचे उत्तर शोधत ठिकठिकाणी क चरा कुंड्या बसविल्या. सफाई कर्मचाऱ्यांकडून ओला-सुका कचरा वर्गीकरण करून घेतले. त्याद्वारे खतनिर्मिती करून खताचा उपयोग परसबागेसाठी केला. पाड्यावर ३२९ वैयक्तिक शौचालय उभारले. त्यामुळे गाव १०० टक्के हगणदारीमुक्त केले. तसेच या पाड्यावरील घरे येणा-या पाहुण्यांना एकसमान भासतात कारण येथे त्यांनी लोकसहभागातून विश्वासाने एकच रंग देण्याचा ठराव पारित करून अंमलबजावणी केली. महिलांकडून त्यांनी सामुहिक स्वच्छता सुरू केली. जिल्हा परिषदेच्या शाळेमार्फत स्वच्छता शिवार फेरी काढून जनजागृतीवर भर दिला. गावात संपुर्णत: प्लॅस्टिक बंदी केली. यामुळे त्यांना लोकमतच्या वतीने ‘स्वच्छता’ या गटात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्Nashikनाशिक