सारंगखेडा फेस्टिवलमध्ये पेठचा ‘चेतक’ ठरला सर्वोत्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 12:33 IST2019-12-24T12:33:11+5:302019-12-24T12:33:23+5:30
पेठ - घोड्यांच्या बाजारासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे आयोजित करण्यात आलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये पेठ येथील इम्रान शेख व जावेद शेख यांच्या गुलजार चेतक या घोड्याने संपुर्ण देशात प्रथम पारितोषिक पटकावले.

सारंगखेडा फेस्टिवलमध्ये पेठचा ‘चेतक’ ठरला सर्वोत्कृष्ट
पेठ - घोड्यांच्या बाजारासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे आयोजित करण्यात आलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये पेठ येथील इम्रान शेख व जावेद शेख यांच्या गुलजार चेतक या घोड्याने संपुर्ण देशात प्रथम पारितोषिक पटकावले. सारंगखेडा येथे आयोजित या फेस्टीवल मध्ये पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाणा आदी राज्यातून हजारो घोडे सहभागी झाले होते. पेठच्या गुलजार चेतकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.चेअरमन मून्ना रावल व जयेश पेखळे याच्या हस्ते मालक इम्रान शेख व जावेद शेख यांचा पारितोषिक प्रदान करून गौरव करण्यात आला.