शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

पेठला रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 18:14 IST

खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने पेठ तालुका दुष्काळाच्या कचाट्यात सापडला असून शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळसदृष्य परिस्थिती असलेल्या तालुक्याच्या यादीत पेठ तालुक्याचा समावेश नसल्याने संतापलेले शेतकरी व सर्वच राजिकय पक्षांच्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी नाशिक - गुजरात महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून पेठ तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देचक्काजाम : पेठ तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

पेठ : खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने पेठ तालुका दुष्काळाच्या कचाट्यात सापडला असून शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळसदृष्य परिस्थिती असलेल्या तालुक्याच्या यादीत पेठ तालुक्याचा समावेश नसल्याने संतापलेले शेतकरी व सर्वच राजिकय पक्षांच्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी नाशिक - गुजरात महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून पेठ तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली.दुपारी 12 वाजता पेठ शहरातील शहीद देवजी राऊत चौकात सत्ताधारी शिवसेनेसह इंदिरा कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, महाराष्ट्र नविनर्माण सेना, आरपीआय आदी राजिकय पक्षाचे पदाधिकारी व शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन करत रस्त्यावर ठिय्या मांडला. पेठ तालुक्यात या वर्षी खरीप हंगाम पुरता वाया गेला असून पावसाच्या अनियमतितेमुळे भात व नागालीची पिके नष्ट झाली आहेत. शासनाच्या दुष्काळाच्या निकषानुसार पेठ तालुक्यात सरासरी पाऊस झाला असला तरीही ऐन पिकांची दाणा भरणीत पाऊस गायब झाल्याने खरीप पिके वाया गेल्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली. तहसीलदार हरिष भामरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आमदार नरहरी झरिवाळ, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भास्कर गावीत, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष निवृत्ती महाले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत, मनसेचे तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, आरपीआयचे अशोक ताठे, डॉ. भारती पवार, सभापती पुष्पा गवळी, उपसभापती तुळशिराम वाघमारे, सदस्य विलास अलबाड, भिका चौधरी, मनोहर चौधरी, शाम काळे, रामदास वाघेरे, शामराव गावीत, गिरीश गावीत, याकूब शेख, पुंडलिक महाले, विठाबाई महाले, नामदेव हलकंदर, दिलीप पाटील, गणेश शिरसाठ, विशाल जाधव, माकपाचे तालुकाध्यक्ष नामदेव मोहांडकर, डॉ. दत्तू पाडवी, जाकीर मनियार, समीर राजे. पुनम गवळी, यशोदा राऊत, शितल रहाणे, संतोष डोमे, गणेश गावीत, रंगनाथ वाडकर, यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. पोलीस निरिक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाराष्ट्रीय महामार्गावर पुकारण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे जवळपास सहा तास वाहतूकीची कोंडी झाली. गुजरात व नाशिकच्या दिशेने अवजड वाहनासह बसेस व खाजगी वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या . राष्ट्रीय महामार्गाचे नुतणीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूकीत आधिकच अडथळे निर्माण झाले. वाहनचालक व प्रवाशांना मात्र तप्त उन्हात झाडाझुडपांचा आसरा घेत दिवस रस्त्यावरच काढावा लागला.माकपाचा आंदोलनातून काढता पायएकीकडे पेठ शहरात सर्वपक्षीय रास्ता रोको सुरू असतांना माकपा व किसान सभेने रास्ता रोको आंदोलनापासून चार हात लांब राहत शहरानिजक असलेल्या संगमेश्वर महादेव मंदिरात पक्षाची बैठक घेतली.आमदार जे.पी. गावीत यांनी बैठकीत माकपा व किसान सभेच्या कार्यकर्त्याना संबोधित केले. माकपाच्य ध्येय धोरणांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रारंभी माकपा आंदोलनात सहभागी होईल असे सांगितले जात असतांना अचानक आंदोलनाच्या दिवशी माकपाने दुर रहाणे पसंत केल्याने आंदोलन स्थळी राजिकय चर्चांना उधान आले होते. शिवाय राज्यात व देशात सत्ता असलेल्या भाजपाने मात्र आंदोलनात सहभाग घेतला नाही.आमदार जे.पी. गावीत अखेरच्या क्षणी आंदोलन स्थळी दाखलदिवसभर रास्तारोको आंदोलनापासून दुर असलेले माकपाचे आमदार जीवा पांडू गावीत यांनी शेवटच्या क्षणी माकपा पदाधिकारी व कार्य कार्यासह आंदोलन स्थळी हजेरी लावली.वीज मंडळाचा केला निषेधपेठ तालुक्यात दररोज 6 ते 8 तास भारिनयमन असून त्या व्यतिरिक्त वीज गायब होत असल्याने शेतकरी मेटाकूटीला आले असल्याने आंदोलन कर्त्यनी वीज वितरण कंपनीचा निषेध करून भारिनयमन रद्द करण्याची मागणी केली. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे काही शेतकर्यांना पाणी असून पिकांना देता आले नसल्याने वीज मंडळाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. 

टॅग्स :droughtदुष्काळagitationआंदोलन