पेठ : नगरपंचायतीच्या दारूबंदी ठरावाला अंमलबजावणीची प्रतिक्षा बाटली आडवी होणार की उभी राहणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:08 IST2018-05-06T00:08:19+5:302018-05-06T00:08:19+5:30
पेठ : दारूसारख्या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उध्दवस्त झाल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.

पेठ : नगरपंचायतीच्या दारूबंदी ठरावाला अंमलबजावणीची प्रतिक्षा बाटली आडवी होणार की उभी राहणार ?
पेठ : दारूसारख्या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उध्दवस्त झाल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत असून या वाईट प्रवृत्तीपासून समाजाला दुर करण्यासाठी पेठ नगरपंचायतीने एक पाऊल पुढे टाकत शहरात संपूर्ण दारूबंदीचा ठराव सहमत करून त्याची अंमलबजावणीसाठी पोलीस व वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला असून या ठरावाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीची नागरिकांना प्रतिक्षा लागून राहिली आहे. पेठ शहराची लोकसंख्या जवळपास साडेआठ हजारावर गेली असून तालुक्याचे शैक्षणिक, व्यापारी केंद्र म्हणून पेठची बाजारपेठ सदैव गजबजलेली असते. त्यामुळे शहरात दारुचा व्यवसायही तेजीत चालत असतो. मद्यसेवनाने अनेक सामान्य कुटूंबांचे संसार उघडयावर आले असून तरु ण वयात अनेकांना आत्महत्या, अपघात यासारख्या संकटांना सामोरे जावे लागले आहे. यावर उपाय म्हणून नगरपंचायत कार्यक्षेत्रात संपूर्ण दारूबंदी करावी असा ठराव नगरसेवक कुमार मोंढे यांनी मांडला. नगरपंचायतीची महासभेत या ठरावाला मंजूरी देऊन त्याच्या योग्य कार्यवाही बाबत वरिष्ठ कार्यालयास सादरही करण्यात आला. मात्र एक महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्याप यावर कार्यवाहीची प्रतिक्षा असून या ठरावाची अंमलबजावणी कधी होते याकडे नगरपंचायत सह पेठ वासियांचे डोळे लागून आहेत.