पेठ : सावळघाटातील वळणावर समोरून येणाऱ्या अवजड ट्रेलरने हूल दिल्याने पेठ-पुणे बस रस्ता सोडून घाटातील खड्ड्यात अडकल्याची घटना आज घडली. बस सुदैवाने दरीच्या विरूद्ध दिशेला असल्यामुळे जीवितहानी टळली असली तरी बसचे नुकसान झाले आहे़शिवाजीनगर डेपोची बस क्रमांक (एमएच१४ बीटी३२९०) पेठहून पुण्याकडे जात होती. सावळघाटात समोरून येणाऱ्या ट्रेलरचालकाने हूल दिल्याने बसचालकाचा ताबा सुटला़ बस चढावावर असल्याने रस्ता सोडून डोंगराच्या भागाला घासली गेल्यामुळे बसमधील प्रवासी घाबरले.मात्र यात कोणतीही हानी झाली नसल्याचे स्पष्ट होताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या मार्गावरून जाणारी अवजड वाहने उतर वाहनांना रस्ताच देत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे़ त्यातच खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे़ (वार्ताहर)
ट्रेलरने हूल दिल्याने पेठ-पुणे बसला अपघात
By admin | Updated: August 15, 2014 00:36 IST