पेठ बस आगार बनले समस्यांचे माहेरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 18:05 IST2019-07-09T18:04:34+5:302019-07-09T18:05:32+5:30
पेठ : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन खासगी प्रवाशी वाहतूकीला टक्कर देण्यासाठी परिवहन महामंडळाच्या वतीने विविध प्रयत्न केले जात असतांना पेठ आगार मात्र विविध समस्यांचे माहेरघर बनल्पाने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने निवेदनाद्वारे निषेध व्यक्त केला आहे.

पेठ बस आगार बनले समस्यांचे माहेरघर
आगारप्रमूख यांना दिलेल्या निवेदनात वेळेवर बसेस सुटत नाहीत, गळक्या व नादुरु स्त बसेस पाठवल्या जातात, बस स्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतागृहांची दयनिय अवस्था, बसस्थानक परिसरात साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी आदी समस्यांकडे संघटनेच्या वतीने लक्ष वेधण्यात आले. पेठ हे गुजरात व महाराष्ट्र या दोन्ही राज्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे स्थानक आहे. बलसाड, वापी, अहमदाबाद येथून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची ये -जा होत असतांना बसस्थानक परिसरात मात्र असुविधा असल्याने प्रवाशांची कुचंबना होत आहे. पेठ येथे माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणाची सुविधा असल्याने महामंडळाने बससेवा सुरळीत व सुविधापूर्ण द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर युवा कार्याध्यक्ष गणेश गवळी,ओमकार भोये,अनिल सातपुते,देविदास भोये,गौरव गावंडे, दिनेश चौधरी ,प्रवीण गायकवाड, युवराज हाडस,कौशल्य भोये,महाले भूमिका,विद्या भोये, छाया बोंबले, विनायक भोये आदी विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.