शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

पेठ बसस्थानक समस्यांचे आगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:03 PM

पेठ : येथील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून, परिवहन महामंडळाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी पेठ तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखड्डे, गळक्या बस : उपाययोजनांची मागणी

पेठ : येथील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून, परिवहन महामंडळाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी पेठ तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.तालुक्यात एकमेव असलेल्या बसस्थानकातून महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही परिवहन सेवा पुरवली जाते. बलसाड ते नाशिकदरम्यानच्या १५० किमी प्रवासात पेठ हे एकच बसस्थानक आहे. मात्र या आवारात पावसाळ्यात तलावाचे स्वरूप प्राप्त होते. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच खड्ड्याने स्वागत करण्यात येते.परिसरात सर्वत्र खड्डे असल्याने बसस्थानक परिसरात प्रवाशांना कसरत करत मार्गक्र मण करावे लागते. पेठ आगाराच्या बसेस म्हणजे भरवशाच्या म्हशीला टोणगा अशी गत झाली आहे. बसस्थानकातून सुटलेली बस इप्सित गावाला पोहचेलच असे नाही. कोणत्याही रस्त्याला गेलात तर एक तरी बस नादुरुस्त अवस्थेत हमखास आढळून येते. त्यात पावसाळ्यात तर बसच्या आत आणि बाहेर पाण्याचाच अनुभव येतो. बसेसला लागलेली गळती, तुटलेले बाकडे आणि फाटलेले कुशन यामुळे गाड्यांचीही पुरती वाट लागलेली आहे. अशाधोकेदायक बसेसमधून प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निवेदनपेठ आगारातील असुविधांबाबत पेठ तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस आक्र मक झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या उपस्थितीत तहसीलदार हरिष भामरे यांना निवेदन देण्यात आले. परिवहन महामंडळाने चांगल्या स्थितीत बसेस पुरवठा न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी तालुकाध्यक्ष दामू राऊत, युवक अध्यक्ष गिरीश गावित, नगरसेवक गणेश गावित, तुळसा फोद्दार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.