सततचा भीजपाऊस पिकांसाठी हानीकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 18:40 IST2020-08-16T18:39:58+5:302020-08-16T18:40:33+5:30
सायखेडा : श्रावणात पावसाच्या सरीमागून सरी कोसळत असल्याने वातावरण आल्हाददायी बनले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, गुरु वारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरू होता. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गोकुळाष्टमीच्या पूर्वसंध्येपासून भीजपाऊस झाल्यामुळे चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. अकलपाडासह छोट्या-मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठाही वाढत असून, खिरपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

सतत चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे बहरलेले पिक.
सायखेडा : श्रावणात पावसाच्या सरीमागून सरी कोसळत असल्याने वातावरण आल्हाददायी बनले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, गुरु वारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरू होता. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गोकुळाष्टमीच्या पूर्वसंध्येपासून भीजपाऊस झाल्यामुळे चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. अकलपाडासह छोट्या-मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठाही वाढत असून, खिरपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
सध्या सर्वच नक्षत्रात पाऊस पडत आहे. सृष्टीने हिरवा शालू परिधान केल्यागत वातावरण आहे. शेत-शिवारात जोमदार पिके डोलत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात नभ मेघांनी आक्र मिले... असे वातावरण आहे. शनिवारी तर दिवसभर सूर्यदर्शन झालेच नाही. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. सध्या आश्लेषा नक्षत्र सुरू असून, सर्वच नक्षत्रात एकसारखा सुरू असलेला पाऊस खरीप पिकांसाठी हानीकारक ठरण्याची शक्यता शेती तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस अनेक दिवसापासून सुरू असल्याने रिमझिम पाऊस हा पिकांना काही दिवस चांगला असतो मात्र सलग चार ते पाच दिवसापासून पाऊस पडत असल्याने काही पिकांना त्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पिके पिवळे पडण्याची भीती आहे. टमाटे पिकाला फुलकूज होत आहे, त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
- भाऊलाल खालकर, शेतकरी.