मुलगी झाली म्हणून छळ; विवाहितेची आत्महत्त्या

By Admin | Updated: August 20, 2016 01:42 IST2016-08-20T01:18:01+5:302016-08-20T01:42:10+5:30

मुलगी झाली म्हणून छळ; विवाहितेची आत्महत्त्या

Persecution as a daughter; Marriage Suicide | मुलगी झाली म्हणून छळ; विवाहितेची आत्महत्त्या

मुलगी झाली म्हणून छळ; विवाहितेची आत्महत्त्या

पंचवटी : मुलगी झाली म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सदर विवाहितेच्या पतीसह सासरा व दीर अशा तिघांवर आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी मयत दीपिका सरवाया हिचे वडील हिरामण पितांबर घोगारी (रा. वाडा पालघर, ठाणे) यांनी दिली आहे. गुरुवारी (दि.१८) रोजी कोणार्कनगर येथील चामुंडा निवासमध्ये राहणाऱ्या दीपिका नीलेश सरवाया हिने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. दीपिका हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी नीलेश सरवाया याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी पती नीलेश, काथीभाई सरवाया (सासरा), संतोष सरवाया (दीर) यांनी दीपिकावर चारित्र्याचा संशय घेऊन तिचा शारीरिक व मानिसक छळ सुरू केला. काही महिन्यांनी दीपिकाला मुलगी झाल्याने सासरच्या मंडळीकडून तिला आणखी त्रास दिला जाऊ लागला. वारंवार होणाऱ्या या छळाला कंटाळूनच दीपिकाने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्त्या केली अशी तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांत दिल्याने विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊन पतीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक योगीता जाधव तपास करत आहे. (वार्ताहर )

Web Title: Persecution as a daughter; Marriage Suicide