शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परमिट रूम, बिअर बार चालक आर्थिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 01:05 IST

नाशिक : मार्च महिन्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या तगाद्यामुळे परमिट व बिअर बार मालकांकडून वर्षभराचे परवाना शुल्क भरून घेतले, त्यानंतर मात्र अवघ्या काही दिवसातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शासनाने लॉकडाऊन जाहीर करून परमीट रूम व बिअर बार बंद करून टाकले. गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले बिअर बार व परमिट रूमचे परवाना शुल्क भरूनही व्यवसाय करता येत नाही, दुसरीकडे वाईन शॉपमधून मद्यविक्री सुरू झाल्यामुळे परमिट रूम, बिअर बारचे महत्त्वही कमी झाले आहे. अशा परिस्थितीत वर्षभराचे शुल्क भरूनही परवानाधारक चालक-मालक आर्थिक अडचणीत सापडलेले असताना शासनाने त्यांच्या व्यवसायाला अद्यापही अनुमती दिलेली नाही.

ठळक मुद्देवर्षभराचे शुल्क भरले : व्यवसाय सुरू होण्याविषयी साशंकता

 अनलॉक की लॉकडाऊन? लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मार्च महिन्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या तगाद्यामुळे परमिट व बिअर बार मालकांकडून वर्षभराचे परवाना शुल्क भरून घेतले, त्यानंतर मात्र अवघ्या काही दिवसातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शासनाने लॉकडाऊन जाहीर करून परमीट रूम व बिअर बार बंद करून टाकले. गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले बिअर बार व परमिट रूमचे परवाना शुल्क भरूनही व्यवसाय करता येत नाही, दुसरीकडे वाईन शॉपमधून मद्यविक्री सुरू झाल्यामुळे परमिट रूम, बिअर बारचे महत्त्वही कमी झाले आहे. अशा परिस्थितीत वर्षभराचे शुल्क भरूनही परवानाधारक चालक-मालक आर्थिक अडचणीत सापडलेले असताना शासनाने त्यांच्या व्यवसायाला अद्यापही अनुमती दिलेली नाही.देशपातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केला. अत्यावश्यक सेवा या लॉकडाऊनमधून वगळण्यात येऊन नागरिकांची गर्दी होणारे व्यवसाय पूर्णत: बंद केले. यात वाइन शॉप, परमिट रूम, बिअर बारचादेखील समावेश होता. तत्पूर्वी मार्च महिन्यातच पुढील आर्थिक वर्षासाठी या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाचा परवाना नूतनीकरण करणे आवश्यक असल्याने जवळपास सर्वच परमिट रूम, बिअर बार चालक-मालकांनी आपले परवाने नूतनीकरण केले. शासनाने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी परवाना शुल्कात वाढ केल्यामुळे एका परवानाधारकाला सहा लाख ९५ हजार रुपये तर त्यापेक्षा अधिक परवानाधारकांनी त्याप्रमाणात शुल्काची रक्कम भरली. मात्र रक्कम भरल्यानंतर अवघ्या काही दिवसातच कोरोनामुळे व्यवसाय बंद करावा लागला. या परमिट रूम, बिअर बार चालकांकडे पडून असलेला मद्यसाठा अनेक महिने लॉकडाऊनमुळे विक्री करता आला नाही. परिणामी भांडवल गुंतून पडले व व्यवसायही बंद पडल्याने परवानाधारक सैरभैर झाले. सात महिन्यांपासून बंद असलेले व्यवसाय नजीकच्या काळात सुरू होतील की नाही, याविषयी अद्यापही साशंकता व्यक्त केली जात आहे. या परमिट रूम, बिअर बारमध्ये कामाला असलेले कारागीर बेरोजगार तर झालेच, परंतु जागेचे भाडे थकले, वीजबिल, पाणीपट्टी, घरपट्टी भरणेही मुश्कील झाले आहे. परमिट रूम, बिअर बार बंद असले तरी, शासनाने वाइन शॉप सुरू केले, त्याचबरोबर ढाबे, हॉटेलही सुरू ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे मद्यपींची सोय झाली आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत मद्यविक्री केली जात असून, परमिट रूम, बिअर बारची गरजही संपुष्टात आल्याचे चित्र आहे. मात्र गेल्या सात महिन्यांपासून शासनाचा परवाना शुल्क भरूनही व्यवसाय करण्याची अनुमती नसल्याने परवानाधारक हवालदिल झाले आहेत. शासनाकडून परवानापोटी भरलेले शुल्क परत दिले जाईल की, पुढच्या वर्षासाठी रक्कम वळती केली जाईल याचा कोणताही उलगडा झालेला नाही. व्यवसाय सुरू करण्यासाठी हाती भांडवलही शिल्लक नसल्याने परमिट रूम, बिअर बार चालक-मालक पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय