लष्करी हद्दीलगतच्या बांधकामास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:50 PM2020-07-11T22:50:05+5:302020-07-12T01:55:30+5:30

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला नाशिकच्या लष्करी हद्दीलगत बांधकामांच्या परवानगीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या संदर्भात क्रेडाई नाशिक मेट्रोने केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून, लष्करी हद्दीपासून १०१ मीटर ते ५०० मीटरपर्यंतची चार मजले किंवा १५ मीटर उंचीपर्यंत विकसन परवानगीसाठी कोणतेही ना हरकत प्रमाणपत्राची आता आवश्यकता असणार नाही, अशी माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी दिली.

Permission for construction near military border | लष्करी हद्दीलगतच्या बांधकामास परवानगी

लष्करी हद्दीलगतच्या बांधकामास परवानगी

googlenewsNext
ठळक मुद्देक्रेडाईचा पाठपुरावा । पदाधिकाऱ्यांनी घेतली आयुक्तांची भेट

नाशिक : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला नाशिकच्या लष्करी हद्दीलगत बांधकामांच्या परवानगीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या संदर्भात क्रेडाई नाशिक मेट्रोने केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून, लष्करी हद्दीपासून १०१ मीटर ते ५०० मीटरपर्यंतची चार मजले किंवा १५ मीटर उंचीपर्यंत विकसन परवानगीसाठी कोणतेही ना हरकत प्रमाणपत्राची आता आवश्यकता असणार नाही, अशी माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी दिली.
लष्करी हद्दीलगत बांधकामांच्या परवानगीसाठी अडचणी येत असल्याने अनेक बांधकाम व्यावसायिक आणि नागरिकांचीही अडचण होत होती. परंतु निर्णयामुळे लष्करी हद्दीलगतच्या भागात घरकुलांसाठी गुंतवणूक करून बांधकाम परवानगी न मिळालेल्या नागरिकांना दिलासा मोठा मिळाला असून, अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
या समस्येबाबत क्रे डाई नाशिक मेट्रोच्या एका शिष्टमंडळाने फेब्रुवारी महिन्यात खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेत संबंधितांना याबाबत निर्देश देण्याची विनंतीदेखील केली होती. त्यानुसार २९ जून रोजी स्थानिक स्टेशन कमांडंट यांना हेमंत गोडसे यांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना स्टेशन कमांडंट यांनी हे निर्बंध शिथिल केल्याची माहिती दिल्याचे रवि महाजन यांनी सांगितले आहे.
या शिष्टमंडळात क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांच्यासह उपाध्यक्ष कृणाल पाटील, सहसचिव अनिल आहेर तसेच आनंद ठाकरे व हंसराज देशमुख यांचा समावेश होता.
आदेश देण्याची विनंती
स्टेशन कमांडंट यांच्या पत्राचा संदर्भ घेऊन क्रे डाई नाशिक मेट्रोचे शिष्टमंडळ महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना भेटले व रखडलेल्या बांधकाम परवानग्या देण्याबाबत संबंधितांना आदेश देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता बांधकामाच्या परवानगीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: Permission for construction near military border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.