कोरोना संदर्भात लोकप्रतिनिधींची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 16:52 IST2020-03-31T16:49:24+5:302020-03-31T16:52:18+5:30
सटाणा : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी येथील पालिका कार्यालयात तालुक्यातील आरोग्य विभागासह इतर विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

सटाणा येथे आरोग्य विभागासह इतर परिस्थितीच्या आढाव्यासाठी सटाणा नगर परिषदेत विवीध खात्यांच्या प्रमुखखांच्या बैठकीत मार्गदर्शन काताना डॉ. सुभाष भामरे समवेत दिलीप बोरसे विजय भांगरे, सुनिल मोरे, डॉ. बांगर, जितेंद्र इंगळे, हेमलता डगळे, नंदकुमार गायकवाड आदी.
सटाणा : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी येथील पालिका कार्यालयात तालुक्यातील आरोग्य विभागासह इतर विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत गोरगरिबांना अन्नधान्याची अडचण होऊ नये म्हणून धान्याचे वितरण सुरळीत राहावे यासाठी पुरवठा विभागाने दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे.याची पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देत यात कोणीही अडथळा आणण्याच्या प्रयत्नकरत असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांनºयावेळीदेण्यात आल्या.
बागलाण तालुक्यात बाहेर देशातून व परप्रांतातून आलेल्या नागरिकांची सखोल माहिती घेत कोरोनावर मात करण्यासाठी खासदार निधीतून पाच लाख व आमदार बोरसे यांच्या आमदार निधीतून पाच लाख असे एकूण दहा लाख रु पयांचा निधीची तरतूद तालुक्यासाठी करत असल्याचेही जाहीर केले.
यावेळी प्रांत विजय भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय बांगर,पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे,सटाणा पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे उपस्थित होते.