शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दसऱ्याच्या तोंडावर नाशिककरांना गढूळ पाण्याचा 'प्रसाद'; मनपाविरोधात महिलांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 09:47 IST

संतप्त महिलांनी रस्त्यावर आपटले हंडे अन सोडले नळ, एकाही लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्याने दखल घेतली नाही

नाशिक : दसऱ्याच्या एक दिवस अगोदर गुरुवारी सकाळी नाशिक महानगरपालिके या गलथान कारभाराचा फटका पुन्हा एकदा नागरिकांना बसला सणासुदीच्या काळात नाशिक मधील महापालिकेच्या प्रभाग 30 मध्ये असलेल्या वडाळागाव परिसरामध्ये नळांना अक्षरशः पावसाच्या पाण्याप्रमाणे पुरवठा झाल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यावर सोडून दिले तसेच महिलांनी हंडे आपटून मनपा पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त केला.

माती मिश्रित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सलग 2 तास नळांना असेच अशुद्ध गढूळ पाणी आल्याने हे पाणी नागरिकांनी नळ सुरू करून रस्त्यावर सोडले. दरम्यान मनपाचे अधिकारी कोणत्याही लोकप्रतिनिधी, नगरसेवक, महापौर यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी फोन देखील रिसिव्ह न केल्याने संतापात अधिकच भर पडली.

वडाळा गावात अशा प्रकारे दूषित पाणीपुरवठा होण्याची ही पहिली वेळ नसल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला नेहमीच धोका निर्माण होतो. पाणी पुरवठा विभागाने होणाऱ्या दूषित पाणी पुरवठाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.  गुरुवार (दि14) रोजी सकाळी वडाळा गावातील खंडोबा चौक, माळी गल्ली, राजवाडा, रामोशी वाडा, गरीब नवाज कॉलनी, गोपालवाडीसह आदी परिसरात दूषित पाणीपुरवठा झाल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे गावातील नागरिकांना पोटाचे विकाराच्या तक्रारी उद्धभवू शकतात तसेच अशुद्ध पाण्यावाटे पसरणाऱ्या आजराची लागण होण्याची श्यक्यता नाकारता येत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे .मग मुकणे धरणातील पाणी फिल्टर होत नाही का...?नाशिक महानगर पालिकेकडून गंगापूर मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आज वडाळा गावाला पाणीपुरवठा करणारा जलकुंभ मुकणे धरणात जलवाहिनीद्वारे भरला गेला त्यामुळे गावात गढूळ पाणी पुरवठा झाल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले तर मग मुकणेमधून येणारे पाणी फिल्टर होत नाही का असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केलेला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक