दसऱ्याच्या तोंडावर नाशिककरांना गढूळ पाण्याचा 'प्रसाद'; मनपाविरोधात महिलांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 09:47 AM2021-10-14T09:47:19+5:302021-10-14T09:47:33+5:30

संतप्त महिलांनी रस्त्यावर आपटले हंडे अन सोडले नळ, एकाही लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्याने दखल घेतली नाही

People in Nashik are getting muddy water. Women got angry against the corporation | दसऱ्याच्या तोंडावर नाशिककरांना गढूळ पाण्याचा 'प्रसाद'; मनपाविरोधात महिलांचा संताप

दसऱ्याच्या तोंडावर नाशिककरांना गढूळ पाण्याचा 'प्रसाद'; मनपाविरोधात महिलांचा संताप

googlenewsNext

नाशिक : दसऱ्याच्या एक दिवस अगोदर गुरुवारी सकाळी नाशिक महानगरपालिके या गलथान कारभाराचा फटका पुन्हा एकदा नागरिकांना बसला सणासुदीच्या काळात नाशिक मधील महापालिकेच्या प्रभाग 30 मध्ये असलेल्या वडाळागाव परिसरामध्ये नळांना अक्षरशः पावसाच्या पाण्याप्रमाणे पुरवठा झाल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यावर सोडून दिले तसेच महिलांनी हंडे आपटून मनपा पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त केला.

माती मिश्रित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सलग 2 तास नळांना असेच अशुद्ध गढूळ पाणी आल्याने हे पाणी नागरिकांनी नळ सुरू करून रस्त्यावर सोडले. दरम्यान मनपाचे अधिकारी कोणत्याही लोकप्रतिनिधी, नगरसेवक, महापौर यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी फोन देखील रिसिव्ह न केल्याने संतापात अधिकच भर पडली.

वडाळा गावात अशा प्रकारे दूषित पाणीपुरवठा होण्याची ही पहिली वेळ नसल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला नेहमीच धोका निर्माण होतो. पाणी पुरवठा विभागाने होणाऱ्या दूषित पाणी पुरवठाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.  गुरुवार (दि14) रोजी सकाळी वडाळा गावातील खंडोबा चौक, माळी गल्ली, राजवाडा, रामोशी वाडा, गरीब नवाज कॉलनी, गोपालवाडीसह आदी परिसरात दूषित पाणीपुरवठा झाल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे गावातील नागरिकांना पोटाचे विकाराच्या तक्रारी उद्धभवू शकतात तसेच अशुद्ध पाण्यावाटे पसरणाऱ्या आजराची लागण होण्याची श्यक्यता नाकारता येत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे .

मग मुकणे धरणातील पाणी फिल्टर होत नाही का...?
नाशिक महानगर पालिकेकडून गंगापूर मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आज वडाळा गावाला पाणीपुरवठा करणारा जलकुंभ मुकणे धरणात जलवाहिनीद्वारे भरला गेला त्यामुळे गावात गढूळ पाणी पुरवठा झाल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले तर मग मुकणेमधून येणारे पाणी फिल्टर होत नाही का असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केलेला आहे.

Web Title: People in Nashik are getting muddy water. Women got angry against the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक