शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

लिंग निदान करणाऱ्या घोटीतील डॉक्टरला शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 6:43 PM

लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याअंतर्गत घोटी येथील डॉ. प्रवीण निकम यांना इगतपुरी न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा व दहा हजारांचा दंड सुनावला.

ठळक मुद्देतीन वर्षाचा कारावास; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

इगतपुरी : लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याअंतर्गत घोटी येथील डॉ. प्रवीण निकम यांना इगतपुरी न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा व दहा हजारांचा दंड सुनावला.इगतपुरी तालुका न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश श्रीमती आर. एन. खान यांनी लिंग निवडीस प्रतिबंध कायदा अधिनियम सन २००३ च्या तरतुदीचे कलमाअंतर्गत तालुक्यात पहिलाच गुन्हा सिद्ध करीत घोटी येथील डॉ. प्रवीण मोतीराम निकम यांना लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याअंतर्गत तीन वर्षांची शिक्षा व दहा हजारांचा दंड सुनावल्याने तालुक्यातील डॉक्टरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.इगतपुरी तालुक्यात ११ सष्टेंबर २०१८ रोजी लिंग निवडीस प्रतिबंधकामी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या धडक मोहिमेत घोटी येथील मानसी डायग्नोस्टिक सेंटर येथे धाडसत्र मोहीम राबविली होती. यावेळी घोटी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. संजय सदावर्ते यांच्या लिंग निवडीबाबत काही पुरावे लक्षात येताच त्यांनी मानसी डायग्नोस्टिक सेंटरचे डॉ. प्रवीण निकम यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. संबंधित गुन्ह्यातील न्यायालयीन कामकाज सरकारी विशेष साहाय्य अभियोक्ता अ‍ॅड. रेश्मा युवराज जाधव व विधि समुपदेशक आरोग्य विभागाच्या अ‍ॅड. सुवर्णा शेफाळ यांनी काम पाहिले. आरोपीने आदेशित न्यायालयीन दंड न भरल्यास आरोपीला एक महिन्याचा साध्या कारावासाची शिक्षाही यावेळी सुनावण्यात आली. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशानुसार एक वर्षाच्या आत या केसचा निकाल लागला असल्याची माहिती अ‍ॅड. रेश्मा जाधव यांनी दिली. यावेळी वकील संघाचे अ‍ॅड. युवराज जाधव, अ‍ॅड. सुवर्णा शेफाळ, पोलीस हवालदार एस. टी. थोरात आदी उपस्थित होते.न्यायालयात सबळ पुरावेडॉ. प्रवीण निकम यांच्याविरुद्ध सबळ पुरावा सरकारी पक्षाने आणल्याने तो न्यायालयाने मान्य केल्याने सदर गुन्ह्यात आरोपीस शिक्षा फर्माविण्यात आली, अशी माहिती अ‍ॅड. रेश्मा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयdoctorडॉक्टर