शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
2
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
3
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
4
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
5
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
6
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
7
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
8
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
9
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
10
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
11
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
12
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
13
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
14
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
15
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
16
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
17
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
18
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
19
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
20
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

रस्त्यावरील वाहनांवर होणार दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 1:05 AM

शहर वाहतूक शाखेच्या वतीने नाशिकरोड भागात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व ‘नो पार्किंग’ जागेत उभ्या केलेल्या दुचाकी वाहनांना टोर्इंग करून त्यांच्यावर शनिवारी (दि.१) दंडाची कारवाई केली जाणार आहे.

नाशिकरोड : शहर वाहतूक शाखेच्या वतीने नाशिकरोड भागात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व ‘नो पार्किंग’ जागेत उभ्या केलेल्या दुचाकी वाहनांना टोर्इंग करून त्यांच्यावर शनिवारी (दि.१) दंडाची कारवाई केली जाणार आहे.  नाशिकरोड भागातील काही रस्त्यावर वाहने वाहनचालक उभी करत असल्याने सतत वाहतुकीची कोंडी होत असते. नो पार्किंगच्या जागेत सर्रासपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी व बेशिस्तपणे कुठेही वाहने उभी करणाºया वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखा युनिट ४कडून नोटप्रेस मेनगेट व समोरील भिंतीलगत, शिवाजी पुतळा ते रेल्वेस्थानक, मुक्तिधाम ते बिटको चौक व बिटको चौक ते नाशिकरोड पोलीस ठाण्यापर्यंत दुतर्फा नो पार्किंगमध्ये वाहतुकीला अडथळा ठरणारी दुचाकी टोर्इंग करून नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करून आर्थिक दंडाची कारवाई केली जाणार आहे. इतर गरजेच्या ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लावण्याबाबत वाहतूक शाखेकडून पाठपुरावा केला जात आहे. वाहन चालकांनी नो पार्किंग व वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने उभी करू नये, असे आवाहन शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी शहर वाहतूक शाखेने गरज नसलेले हे पदपथ काढुन टाकण्यासाठी  मनपाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. तसेच आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, बिटको चौक या  ठिकाणी प्रवासी भाडे शोधण्यासाठी भरचौकात गरागर फिरणाºया रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची गरज आहे.टोर्इंग कारवाई फक्त आर्थिक दंडासाठी का?शहर वाहतूक शाखेकडून शनिवारपासून नाशिकरोड भागात मुख्य हमरस्त्यावरील ‘नो पार्किंग’मध्ये उभी राहणारी दुचाकी वाहने टेम्पोमधून टोर्इंग करून दंडाची कारवाई केली जाणार आहे. मात्र नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांवर कारवाई केली जाणार नाही. दुचाकीपेक्षा चारचाकीमुळे वाहतुकीची कोंडी जास्त प्रमाणात होत असताना सुद्धा शहर वाहतूक शाखेकडे क्रेन उपलब्ध नसल्यामुळे चारचाकी वाहनांवर प्रारंभी कारवाई केली जाणार नाही. वाहतूक कोंडी सोडविण्याचा व बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण होत नसेल तर दुचाकीवरील टोर्इंगची कारवाई ही फक्त आर्थिक महसुलासाठी केली जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.नियोजनाची खरी गरजबिटको ते देवळालीगाव, बिटको ते शिवाजी पुतळा व शिवाजी पुतळा ते आंबेडकर पुतळा या रस्त्याच्या दुतर्फा कडेला मनपाने पदपथ बांधले आहेत. या रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात दुकाने असून, ग्राहकांना उंच पदपथमुळे आपली वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. वास्तविक या पदपथाच्या बहुतांश जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वसले असून, या पदपथाच्या पादचाºयांना कुठलाही फायदा होत नाही.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसNashikनाशिक