Penalties are levied on those who do not wear masks | मास्क न वापरणाऱ्यांवर उगारला दंडाचा बडगा

मास्क न वापरणाऱ्यांवर उगारला दंडाचा बडगा

ठळक मुद्देदिंडोरी : पोलिसांनी वसुल केला १४ हजार रुपयांचा दंड

दिंडोरी : रस्त्यावर फिरताना मास्क न वापरणाऱ्या ६८ नागरीकांवर नगरपंचायतीने कारवाई करीत १४ हजार ३२० रुपये दंड वसुल केला. शहरात कोरोना विष्णू संसर्ग आटोक्यात रहावा, त्याचा फैलाव होऊ नये म्हणून नगरपंचायत प्रशासनाकडून शहरात नागरीकांनी मास्क वापरावा, फिजिकल डिस्टन्स पाळावे, वारंवार हात धुवावेत यासाठी सातत्याने प्रबोधन केले जात आहे.

घंटागाडीच्या माध्यमातून लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजना व सूचना देत आहे. तरीही शहरात कोरोना बाबत काही नागरिक बेफिकिरी दाखवत असल्याचे निदर्शनास येत असल्याने नगरपंचायत प्रशासनाने, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तिक कार्यवाही करून भरारी पथकाद्वारे दंडात्मक कारवाईला सुरूवात केली आहे.
सोमवारी (दि.२२) शहरातील ६८ नागरिकांवर मास्क न वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच नागरिकांना मोफत मास्कचेही वाटप केले. पोलीस प्रशासनामार्फत कोरोना विषयक नियम न पाळणाऱ्या वाहनधारक व विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिंडोरी शहरात आत्तापर्यन्त रुग्णसंख्या आटोक्यात आहे. नगरपंचायत प्रशासनाने दिंडोरीत सातत्याने गर्दी होऊ नये, मास्क वापरावे याबाबत प्रबोधन केले. ह्यमाझी वसुंधराह्ण अभियानांतर्गत पथनाट्याद्वारे स्वच्छता विषयक जनजागृती केली.
दिंडीरी शहरात दिवसभर ध्वनीक्षेपकाद्वारे गाडी फिरवत नागरिकांचे प्रबोधन सुरू ठेवले आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले, तहसीलदार पंकज पवार, पोलीस उपनिरिक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी प्रशांत पोतदार, कर निरीक्षक प्रदीप मावलकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग धीरज भामरे, नगर अभियंता सुनील पाटील, ईश्वर दांडगव्हाळ, हर्षल बोरस्ते, अमोल मवाळ, राजेंद्र खिरकाडे, राजेंद्र गायकवाड, सचिन जाधव, दीपक सोळंकी इत्यादी नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी यांनी शहरात धडक मोहीम राबवत आहेत.

मास्क न वापरणाऱ्या, दुकानांपुढे फिजिकल डिस्टन्स न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. नागरिक व व्यापाऱ्यांनी काळजी घेत मास्क वापरावे, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दी करू नये, शासनाच्या नियम सूचनांचे काटेकोर पालन करावे व कोरोना विरुद्धच्या लढाईत सहकार्य करावे.
- नागेश येवले मुख्याधिकारी, नगरपंचायत, दिंडोरी.

Web Title: Penalties are levied on those who do not wear masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.