सायकलींगला प्रोत्साहन देण्यासाठी रविवारी नाशिकमध्ये पेलोटोेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 07:04 PM2020-02-13T19:04:25+5:302020-02-13T19:10:19+5:30

नाशिक : शहराला सायकल चळवळीचे उगमस्थान मानले जाते. शहराला देशाची सायकल राजधानी बनविण्याच्या उद्देशाने नाशिक सायकलिस्ट्स फाउण्डेशन मनपा, स्मार्टसिटीच्या साथीने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या शनिवारपासून (दि.१५) चालू वर्षाची सर्वांत मोठी सायकलपटूंची स्पर्धा अर्थात ‘पेलोटोन-२०२०’ शहरात रंगणार आहे, अशी माहिती फाउण्डेशनचे अध्यक्ष रत्नाकर आहेर यांनी गुरुवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत दिली.

 Peloton in Nashik on Sunday to promote cycling | सायकलींगला प्रोत्साहन देण्यासाठी रविवारी नाशिकमध्ये पेलोटोेन

सायकलींगला प्रोत्साहन देण्यासाठी रविवारी नाशिकमध्ये पेलोटोेन

googlenewsNext
ठळक मुद्देस्मार्ट सिटीचा पुढाकार पर्यावरण स्नेही उपक्रम

नाशिक: शहराला सायकल चळवळीचे उगमस्थान मानले जाते. शहराला देशाची सायकल राजधानी बनविण्याच्या उद्देशाने नाशिक सायकलिस्ट्स फाउण्डेशन मनपा, स्मार्टसिटीच्या साथीने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या शनिवारपासून (दि.१५) चालू वर्षाची सर्वांत मोठी सायकलपटूंची स्पर्धा अर्थात ‘पेलोटोन-२०२०’ शहरात रंगणार आहे, अशी माहिती फाउण्डेशनचे अध्यक्ष रत्नाकर आहेर यांनी गुरुवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत दिली.

सायकल चळवळ खऱ्या अर्थाने नाशिकमधून सुरू झाली. शहराची वाटचाल स्मार्टसिटीकडे होत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता नाशिककरांमध्ये सायकलप्रेम अधिकाधिक वाढविण्यासाठी सातत्याने फाउण्डेशन प्रयत्न करत आहे. यंदा मनपा, स्मार्ट सिटी कंपनीसोबत बैठक घेऊन सायकल चळवळ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासंदर्भातदेखील चर्चा करण्यात आल्याचे आहेर यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी पेलोटोन स्पर्धेेचे कोच मितेन ठक्कर, वैभव शेटे, नंदकुमार पाटील, डॉ. मनीषा रौंदळ उपस्थित होते.

शनिवारी सकाळी ८०कि.मीच्या सांघिक आव्हान देणारी खुल्या गटासाठीची सायकल स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेला उंटवाडी येथील ठक्कर डोमपासून प्रारंभ होणार आहे. रविवारी ग्रीन राइड (५.किमी), कॉर्पोरेट राइड (१०किमी), कीड््स राइड होणार आहे. यंदा स्थानिक सायकलपटू स्पर्धकांचा गट वेगळा ठेवण्यात आला असून, त्यांना दोन्ही गटांतून बक्षिसे जिंकण्याची संधी राहणार आहे. स्पर्धात्मक स्वरूपात सर्व गटांसाठी ३२ हजार ५०० रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. पहिल्या १०० स्पर्धकांना सायकलिंगची जर्सी देण्यात येणार आहे. यंदा प्रथमच स्पर्धेदरम्यान टाइमिंग चीपचा वापर केला जाणार आहे.

Web Title:  Peloton in Nashik on Sunday to promote cycling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.