पादचारी महिलेचे मंगळसूत्र खेचले

By Admin | Updated: April 7, 2017 18:17 IST2017-04-07T18:17:07+5:302017-04-07T18:17:07+5:30

पादचारी महिलेचे मंगळसूत्र खेचले

The pedestrians fly the Mangalsutra | पादचारी महिलेचे मंगळसूत्र खेचले

पादचारी महिलेचे मंगळसूत्र खेचले

नाशिक : मंदिरातून पायी घरी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना मंगळवारी (दि़ ४) दुपारच्या सुमारास सिम्बॉयसिस कॉलेजसमोर घडली़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैशाली अनिल नाईक (४२, रा़ प्लॉट नंबर १३, निर्मल टाइल्स, एमआयडीसी अंबड) या दुपारी एक वाजेच्या सुमारास महापालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळील कच्च्या रस्त्याने पायी जात होत्या़ त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्याने नाईक यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र खेचून नेले़
या प्रकरणी नाईक यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The pedestrians fly the Mangalsutra