पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:03+5:302021-02-05T05:39:03+5:30

--------------------- घरात प्रवेश करून सोनसाखळी लांबविली नाशिक : हिंगणवेढे येथे राहणारे धात्रक कुटुंबीय रात्री घराच्या गच्चीवर झोपलेले असताना एका ...

The pedestrian snatched the woman's gold chain | पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली

पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली

---------------------

घरात प्रवेश करून सोनसाखळी लांबविली

नाशिक : हिंगणवेढे येथे राहणारे धात्रक कुटुंबीय रात्री घराच्या गच्चीवर झोपलेले असताना एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराची कडी, कुलूप तोडून घरात प्रवेश करत ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली. याप्रकरणी किसन कचरू धात्रक (रा. हिंगणवेढे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी (दि.२५) रात्री धात्रक कुटुंबीय गच्चीवर झोपलेले असताना चोरट्याने घरात प्रवेश केला व शोकेसमध्ये ठेवलेली सोन्याची पोत चोरून पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

------------------

संभाजी स्टेडियमसमेारून मोटरसायकल चोरीस

नाशिक : सिडकोतील संभाजी स्टेडियमच्या गेटसमोरून मोटरसायकल चोरीला गेली. याप्रकरणी कैलास रघुनाथ जाधव (रा. कामटवाडे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ जानेवारीला जाधव यांनी त्यांची मोटरसायकल क्र. एमएच १५ इक्यू ०५०४ संभाजी स्टेडियमच्या गेटसमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ही ४० हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरून नेली.

--------

Web Title: The pedestrian snatched the woman's gold chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.