पादचारी महिलेचे मंगळसूत्र खेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 01:29 IST2021-11-26T01:28:16+5:302021-11-26T01:29:03+5:30

बेलतगव्हाण गावातून पायी जाणाऱ्या सुनीता मच्छिंद्र भोसले (रा. सूर्यवंशी मळा, माऊलीनगर) यांच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना बुधवारी (दि.२४) रात्रीच्या पावणे नऊच्या सुमारास घडली. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

Pedestrian pulled the woman's mangalsutra | पादचारी महिलेचे मंगळसूत्र खेचले

पादचारी महिलेचे मंगळसूत्र खेचले

देवळाली कॅम्प : बेलतगव्हाण गावातून पायी जाणाऱ्या सुनीता मच्छिंद्र भोसले (रा. सूर्यवंशी मळा, माऊलीनगर) यांच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना बुधवारी (दि.२४) रात्रीच्या पावणे नऊच्या सुमारास घडली. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आपल्या नातेवाइकांसह महिला कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. काम आटोपून घरी परतत असताना त्यांच्या समोरुन दुचाकीने आलेल्या दाेघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. हा प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा करण्यात आला आहे.

Web Title: Pedestrian pulled the woman's mangalsutra