पादचाऱ्यास मोटारसायकलची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST2021-06-17T04:11:25+5:302021-06-17T04:11:25+5:30
मोटारसायकल (क्रमांक एम.एच. १५ एफ.वाय. ८०७६) चालवीत असताना नागाजी हरिभाऊ जगताप, रा.मरळगोई, ता. निफाड ...

पादचाऱ्यास मोटारसायकलची धडक
मोटारसायकल (क्रमांक एम.एच. १५ एफ.वाय. ८०७६) चालवीत असताना नागाजी हरिभाऊ जगताप, रा.मरळगोई, ता. निफाड याने गोरख जाधव या पादचाऱ्याला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले. याबाबत वडनेरभैरव पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कराड करीत आहेत.
---------------------------------------------------------
समता परिषदेच्या वतीने आज आक्रोश आंदोलन
चांदवड : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने गुरुवारी (दि. १७) दुपारी बारा वाजता चांदवड येथील शासकीय विश्रामगृहासमोर गणूर चौफुली येथे ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात ओबीसी आरक्षण पुन्हा मिळावे याची मागणी केली जाणार असल्याचे उत्तम आहेर, अलताफ तांबोळी, देवीदास शेलार, सुनील कबाडे, डॉ. अरुण निकम, अशोक गांगुर्डे, गोकुळ गांगुर्डे, दिनकर एळिंजे, शांताराम गांगुर्डे, सुनील बागूल मतीन घासी, मंगेश एळिंजे, ज्ञानेश्वर पगार यांनी सांगितले.