शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

तिघा पादचारी देवीभक्तावर काळाने घातली झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:11 IST

कळवण : अनेक किमी अंतर पायी वाटचाल करत मजल दरमजल करून चैत्रोत्सव निमित्ताने आई भगवतीच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या तिघा देवीभक्तावर कळवणजवळ कोल्हापूर फाटा येथे सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास काळाने झडप घातल्याने एक देवीभक्त जागीच ठार झाला तर दोन नाशिक येथे औषधोपचार दरम्यान मृत्युमुखी पडल्याने या अपघातात ३ ठार तर दोघे जखमी झाले.

ठळक मुद्देकळवण : पायी जाणाऱ्या यात्रेकरुंना खासगी वाहनाने दिली जोरदार धडक

कळवण : अनेक किमी अंतर पायी वाटचाल करत मजल दरमजल करून चैत्रोत्सव निमित्ताने आई भगवतीच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या तिघा देवीभक्तावर कळवणजवळ कोल्हापूर फाटा येथे सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास काळाने झडप घातल्याने एक देवीभक्त जागीच ठार झाला तर दोन नाशिक येथे औषधोपचार दरम्यान मृत्युमुखी पडल्याने या अपघातात ३ ठार तर दोघे जखमी झाले.देवीभक्त नांदुरीकडे पायी जात असताना कळवणकडून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाºया खासगी प्रवासी वाहतूक गाडीने (एम एच १९ सी एफ ०७५१) कोल्हापूर फाटा येथे पादचारी देवीभक्ताना मागून धडक दिली, त्यात गुंजाळनगर येथील शुभम बापू देवरे हे जागीच ठार झाले, तर त्यांचे चार सहकारी देवीभक्त जखमी झाले. जखमीना कळवण उपजिल्हा रु ग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक येथे जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर दुपारी औषधोपचार सुरु असताना त्यापैकी दोघांचा मृत्यु झाला. या प्रकरणी कळवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमवारी (दि १५) पहाटे ४ वाजेच्या सुमारास देवळा तालुक्यातील खालप येथील देवीभक्त कळवण शहरापासून चार किमी अंतरावर कोल्हापूर फाटा परिसरातुन सप्तश्रुंगी गडाकडे पायी पदयात्रेने चालले होते त्यावेळी कळवणकडून नाशिककडे भरधाव वेगाने खाजगी प्रवासी वाहतूक करणार्या एम एच १९ सी एफ ०७५१ या ट्रक्स क्रु झर गाडीने पाठीमागून रस्त्यावरील पादचारी देवीभक्ताना उडवल्याने त्यात शुभम बापू देवरे (१७) गुंजाळनगर (देवळा) हा झालेल्या अपघातात जागीच ठार झाला तर त्याच्या सोबत असलेले कल्पेश रविंद्र सूर्यवंशी (२५), भाऊसाहेब पुंडलिक पवार (१५) यांच्यासह ३० ते ३५ वयोगटातील दोन भावीक जखमी झाले असून त्यांची ओळख पटलेली नसल्याने त्यांची नावे समजू शकली नाही.दरम्यान घटनास्थळी कळवणचे पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी भेट देऊन पहाणी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ठुमसे तपास करीत आहेत.- सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी चालत जाणार्या भाविकांनी रस्त्याच्या कडेने डाव्या बाजूने सावध रीतीने चालावे तसेच रणरणते उन्हाने रस्ते तापलेले आहेत. चालताना भाविकांना त्रास होतो. म्हणून वाहन धारकांनी नेहमीच्या वेगापेक्षा हळू वेगाने वाहने हळू चालवावी. प्रशासनाला सहकार्य करावे.प्रमोद वाघ -पोलीस निरीक्षक कळवण.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात