दिल्लीतील शेतकरी आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:23 IST2020-12-05T04:23:52+5:302020-12-05T04:23:52+5:30

नाशिक : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात काही लोक राजकीय हेतूने गैरसमज पसरवत असून, दिल्लीतील शेतकरी आंदोलनही ...

The peasant movement in Delhi was politically motivated | दिल्लीतील शेतकरी आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित

दिल्लीतील शेतकरी आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित

नाशिक : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात काही लोक राजकीय हेतूने गैरसमज पसरवत असून, दिल्लीतील शेतकरी आंदोलनही अशाच प्रकारे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप माजी कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी (दि.४) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केला. त्याचप्रमाणे या तीनही कायद्यांचे समर्थन करण्यासाठी ६ डिसेंबरला रयत क्रांती संघटना आझाद मैदानावर निदर्शने करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

केंद्र सरकारने मंजूर केलेली तीनही कृषी उत्पादन व व्यापारविषयक विधेयके ही शेतकरी हिताची असून, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती तथा हमीभाव खरेदी केंद्र यंत्रणेला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचणार नाही, उलट शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार समितीच्या बाहेरही विकण्याचे विविध पर्याय निर्माण होतील, अशा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: The peasant movement in Delhi was politically motivated