राज्य राखीव दलाच्या वतीने लोहोणेर गावातून शांतता फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 00:34 IST2021-01-15T00:33:11+5:302021-01-15T00:34:13+5:30
लोहोणेर : शुक्रवारी (दि.१५) होणारी ग्रामपंचायत निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी देवळा पोलीस व राज्य राखीव दलाच्या वतीने लोहोणेर गावातून शांतता फेरी काढण्यात आली.

राज्य राखीव दलाच्या वतीने लोहोणेर गावातून शांतता फेरी
लोहोणेर : शुक्रवारी (दि.१५) होणारी ग्रामपंचायत निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी देवळा पोलीस व राज्य राखीव दलाच्या वतीने लोहोणेर गावातून शांतता फेरी काढण्यात आली.
लोहोणेर ग्रामपंचायतीची येत्या पंधरा तारखेला पंचवार्षिक निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या दडपणाला बळी न पडता मतदानाच्या दिवशी निर्भयपणे बाहेर पडावे, शांततेचा भंग होऊ नये व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मार्गाने निवडणूक यंत्रणेस सहकार्य करावे या हेतूने ही शांतता फेरी काढण्यात आली असल्याचे देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी सांगितले.
१५ तारखेला लोहोणेर येथे सात जागांसाठी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार असून मतदारांनी मतदान प्रसंगी ओळख पत्र बरोबर ठेवावे व आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी केले आहे. (१४ लोहणेर)