बिल भरा, नाहीतर पाणी कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:11 IST2021-07-16T04:11:55+5:302021-07-16T04:11:55+5:30
पीकविमा योजनेसाठी राज्यातून प्रतिसाद नाशिक : राज्य शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना पीकविमा योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार १५ ...

बिल भरा, नाहीतर पाणी कट
पीकविमा योजनेसाठी राज्यातून प्रतिसाद
नाशिक : राज्य शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना पीकविमा योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार १५ जुलै अखेर सुमारे ४५ लाख शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केले आहेत. दरम्यान, कोरेानामुळे या योजनेला मुदतवाढ दयावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केल्यामुळे याबाबत शासनाकडून विचार सुरू असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.
भूजल सर्वेक्षण यंत्रणा सुवर्ण महोत्सव
नााशिक : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक उपसंचालक कार्यालय व नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्यात अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले. नाशिक विभागातून ८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
अनुसूचित जमात रुग्णांना अर्थसहाय्य
नाशिक : कळवण, सुरगाणा, सटाणा, मालेगाव, देवळा, नांदगाव व चांदवड येथील काेरोनामुळे बाधित रूग्णांना आदिवासी विभागातर्फे रेमडेसिविरसाठी अर्थसहाय्य केले जाणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी विकास मिना यांनी दिली. आदिवासी विकास विभागाच्यावतीने अनुसूचित जमातीच्या रुग्णांसाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे अवाहन मिना यांनी केले आहे.
पोलीस पाटील संघटनेला दिलासा
नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करणाऱ्या पोलीस पाटील संघटनेला मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेने केला आहे. गृहमंत्र्यांच्या माध्यमातून या मागण्यांचा पाठपुरावा केला जात असल्याने या मागणीला वेग आला असल्याचे कक्ष अधिकाऱ्यांनी सांगितल्याने मागण्या लवकरच पूर्णत्वास येतील असा विश्वास पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलीस पाटलांकडून मागण्या केल्या जात आहेत.
कंपन्यांच्या गेटवर कामासाठी विचारणा
नाशिक : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले असून तरुण मुले, महिला, पुरुष दररोज औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या गेटवर कामासाठीची विचारणा करीत असल्याचे चित्र आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील जवळपास सर्वच कंपन्या सुरू झालेल्या आहेत. परंतु कामगारांची संख्या कमी झालेली आहे. अशातच बेरोजगारांकडून कंपन्यांना रोजंदारीकामासाठी विचारणा केली जात असल्याचे दिसते.
जिल्ह्याला अजूनही पावसाची प्रतीक्षा
नााशिक : राज्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळत असतांना नाशिक जिल्ह्याला मात्र अजूनही अपेक्षित पाऊस होऊ शकलेला नाही. १५ जुलैपर्यंत केवळ ६६.२ मिलीमीटर इतक्याच पावसाची नोंद झालेली आहे. अनेक तालुके अजूनही कोरडेच आहेत. कळवण आणि बागलाण या आदिवासी भागात काही प्रमाणात पावसाला सुरूवात झाली असून येत्या काही दिवसांत जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
अंतर्गत रस्त्यांवर चारचाकींचे पार्किंग
नाशिक : शरणपूररोडवर रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांना टाेईंग करून उचलून नेले जात असल्याने वाहनधारक आता अंतर्गत रस्त्यावर वाहने उभी करू लागले आहेत. त्यामुळे अंतर्गत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग करीत असल्याचे दिसून येते. याचा त्रास तेथील रहिवाशांनाही होत आहे.