Pawar was elected president of Trimbak Taluka of ZP | जि.प.कर्मचारी महासंघाच्या त्र्यंबक तालुका अध्यक्षपदी पवार
त्र्यंबकेश्वर येथे राज्य जि.प.कर्मचारी महासंघाच्या त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्षपदी सचिन पवार यांच्या निवडीनंतर उपस्थित कैलास वाघचौरे, अरु ण आहेर, डॉ. भगवान पाटील, महेंद्र पवार आदि.

त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्र राज्य जि.प.कर्मचारी महासंघाच्या त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्षपदी तोरंगण ग्रा.पं.चे ग्रामसेवक सचिन पवार यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला.
राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष कैलास वाघचौरे, जिल्हा महासंघाचे अध्यक्ष अरु ण आहेर, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील व सरचिटणीस महेंद्र पवार यांच्या निरीक्षणाखाली बैठक संपन्न झाली. यावेळी तालुका महासंघास सलग्न सर्व समन्वय संघटना कर्मचारी याचे समन्वय सभेत तालुका महासंघाची निवड प्रक्रि या पार पडली. जिल्हा परिषदेच्या १७ संघटनांमधून महासंघाचे पदधिकारी यांची पुढील प्रमाणे निवड करण्यात आली.
सचिन पवार - अध्यक्ष (ग्रामसेवक), बाळासाहेब गरड - कार्याध्यक्ष (कार्याध्यक्ष), राजेंद्र पाटील - मानद अध्यक्ष, सुनील विटनोर -कोषाध्यक्ष,
भालचंद्र डोळस - उपाध्यक्ष (पशुसंवर्धन), सुरेखा टी.सोनवणे - महिला उपाध्यक्ष, राजेंद्र शिरसाठ - मानद सचिव, पुनम शिंदे - सहसचिव,
मनोहर गांगुर्डे - संघटक, बी. एन. गांगुर्डे - संघटक, भगवान वनमने - संघटक, इंदुमती बेंडकोळी - संघटक, प्रशांत रोकडे - संघटक, अमोल
बागुल - कायदेशीर सल्लागार, किशोर पगार - प्रसिद्धी प्रमुख, सुनील
मोगरे - लेखा परिक्षक आदिंचा समावेश आहे.


Web Title: Pawar was elected president of Trimbak Taluka of ZP
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.