पुण्याच्या मोहिते यांना पवार स्मृती पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 19:00 IST2017-09-29T18:56:47+5:302017-09-29T19:00:28+5:30

पुण्याच्या मोहिते यांना पवार स्मृती पुरस्कार
नाशिक : नीलवसंत मेडिकल फाउंडेशन अॅँड रिसर्च सेंटरच्या वतीने दिला जाणारा ‘डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार’ यंदा पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रफुल्ला मोहिते यांना जाहीर झाला आहे. प्रफुल्ला या एचआव्हीग्रस्त व व्यसनाधीन महिलांसाठी काम, समुपदेशन, डिमेंशिया, अल्झायमर, स्किझोफ्रेनियाग्रस्त आदिंसाठी काम करतात. ७ आॅक्टोबर रोजी हा पुरस्कार शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृह येथे सायंकाळी ५.३० वाजता होणाºया कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
वनाधिपती विनायकदादा पाटील, नीलिमा पवार, रंजना पाटील, वसंतराव खैरनार, शशिकांत जाधव या निवडसमितीने यंदाच्या पुरस्कारासाठी मोहिते यांची एकमताने निवड केली. एक लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.