कोरोनाच्या सावटाखाली पितृपक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 00:55 IST2020-09-04T22:26:51+5:302020-09-05T00:55:03+5:30

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षित अंतर ठेवत घरातील व्यक्तींच्या उपस्थितीत पितृपक्ष पंधरवडा सुरू झाला आहे.

The patriarchy under the coronation | कोरोनाच्या सावटाखाली पितृपक्ष

कोरोनाच्या सावटाखाली पितृपक्ष

ठळक मुद्दे सुरक्षित अंतर ठेवत घरातील व्यक्तींच्या उपस्थितीतच विधी

जळगाव नेऊर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षित अंतर ठेवत घरातील व्यक्तींच्या उपस्थितीत पितृपक्ष पंधरवडा सुरू झाला आहे.
गणपती उत्सवानंतर कोरोनाच्या सावटाखाली पितृपक्ष पंधरवडा सुरू असून, घरातील मृत व्यक्तींना पंधरवड्यात त्यांच्या मृत्यूच्या दिवसाच्या तिथीचा अभ्यास करून पितृपंधरवड्यातील तिथी निवडली जाते. एकंदरीत मृत व्यक्तीच्या मृत्यूसमयीच्या घटिकेचा विचार करून पितरांचा विधी त्या त्या तिथीला करायचा असतो. पितरांच्या दिवशी कावळ्याला विशेष महत्त्व असते.
मनुष्य धाव धाव धावतो, काबाडकष्ट करतो, जमवलेल्या धनसंचयातून स्वर्गवासी वाडवडिलांचेही काही घेणे असते, नाही तर पुढे याच व्यक्तीकडून कुटुंबाना त्रास होतो, अशी श्रद्धा आहे. आपल्या पितरांचा सकारात्मक आशीर्वाद मिळावा म्हणून करावयाचा विधी म्हणजे पितर होय.
पूर्वी पितरांसाठी नातलग, गावातील व्यक्ती, शेजारील व्यक्तींना विशेषकरून बोलविले जात होते, मात्र यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षित अंतर ठेवत घरातील व्यक्तींच्या उपस्थितीत पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे.
भरमसाठ वृक्षतोड व वाढलेल्या शहरीकरणामुळे पशुपक्ष्यांचे निवारेच नष्ट होत चाललेले आहेत. पर्यायाने अनेक पशुपक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पितरांप्रति असणारी श्रद्धा आपल्याला हेच सांगत आहे की, पशुपक्ष्यांना जिवंत ठेवा, त्यांना जतन करा, त्यांना जतन करण्यासाठी निवारास्थाने जपा, वाढवा, लागवड करा, संवर्धन करा.
पितृपक्ष पंधरवड्यात कावळ्यांना विशेष महत्त्व असते. अनेकवेळा कावळे नैवेद्य घेतात, तर काहींचे घेत नाही, त्यामुळे वाड- वडील नाराज असल्याचे भावना निर्माण होते, तर त्यामुळे कावळ्यांना विशेष महत्त्व असते.

Web Title: The patriarchy under the coronation