पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची राष्टÑीय स्तरावर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 17:50 IST2018-11-11T17:48:57+5:302018-11-11T17:50:10+5:30
क्रीडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे झालेल्या मुलींच्या राज्यस्तरीय शालेय भारात्तोलन (वेटलिफ्टिंग) स्पर्धेत मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबायती येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला खेळाडंूनी यशस्वी कामगिरी केली.

पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची राष्टÑीय स्तरावर निवड
१७ व १९ वर्ष वयोगटातील धनश्री नितीन पवार ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक, अनामिका मच्छींद्र शिंदे ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक, तर करुणा रमेश गाढे ७६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. तिन्ही खेळाडूंची शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य शालेय वेटलिफ्टिंग संघात निवड करण्यात आली. खेळाडूंना क्रीडा शिक्षक दिलीप काळे, मनोहर भामरे, प्रविण व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले.