रुग्ण साक्रीचा, पत्ता एकलहऱ्याचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:52 IST2020-06-10T22:42:55+5:302020-06-11T00:52:13+5:30

एकलहरे : कोरोनाबाधितांच्या यादीत बुधवारी (दि.१०) एकलहरे येथील एक रुग्ण असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयाने जाहीर केले आणि एकच गोंधळ ...

Patient Sakri, address Ekalharya! | रुग्ण साक्रीचा, पत्ता एकलहऱ्याचा!

रुग्ण साक्रीचा, पत्ता एकलहऱ्याचा!

एकलहरे : कोरोनाबाधितांच्या यादीत बुधवारी (दि.१०) एकलहरे येथील एक रुग्ण असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयाने जाहीर केले आणि एकच गोंधळ उडाला. नागरिकांमध्ये भीती व्यक्त होऊ लागली. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. तथापि, संबंधित रुग्ण साक्रीचा असून, केवळ स्थानिक पत्ता म्हणून त्यांनी एकलहरे येथील नातेवाइकाचा पत्ता दिला होता, असे स्पष्ट झाले आणि नागरिकांना दिलासा मिळाला.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी जिल्हा शासकीय रुग्णालये त्यांना प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार देत असते. त्यात बुधवारी (दि.१०) दुपारी सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यात एका खासगी लॅबच्या हवाल्याने एकलहरे येथील ५६ वर्षीय पुरुषाला लागण झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे एकलहरे परिसरात खळबळ उडाली.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलेश जेजूरकर व जिल्हा समाजसेवा अधीक्षक हुकूमचंद अगोणे यांनी एकलहरे वीज केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांची भेट घेतली असता रुग्ण हा साक्रीचा असून, त्याने नाशिकमध्ये रुग्णालयात उपचार घेताना त्याचे जवळचे नातेवाईक एकलहरे वीज केंद्रात नोकरीस असल्याने त्यांचा पत्ता दिला असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार रु ग्णाच्या आधार कार्डवरून मूळ गावचा पत्ता दिल्यावर कोरोना अपडेट कक्षात त्याची दुरु स्ती करण्यात आली.
---------------------
एकलहरेत विशेषत: वीज केंद्राच्या वसाहतीत कोणीही कोरोनाबाधित रु ग्ण नाही. बुधवारी (दि.१०) रुग्णाने दिलेल्या एकलहरे येथील नातेवाइकाच्या पत्त्यामुळे गोंधळ झाला होता. मात्र, आता पत्त्यात योग्य ती दुरूस्ती करण्यात आली आहे. एकलहरे परिसरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
- मोहन आव्हाड, मुख्य अभियंता, एकलहरे वीज केंद्र

Web Title: Patient Sakri, address Ekalharya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक