शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात रुग्णाने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 20:52 IST

त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. त्याने दिलेल्या नातेवाईकांच्या भ्रमणध्वनीक्रमांकावर रात्रीउशिरापर्यंत जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून संपर्क साधला जात होता

नाशिक : येथील जिल्हा शासकिय रुग्णालयात शनिवारी (दि.१२) एका २६वर्षीय रुग्णाने संध्याकाळच्या सुमारास येथील पुरुष सामान्य कक्षातील स्वच्छतागृहात जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते.सिन्नर येथील मुसळगावमधील रहिवाशी असलेला सचिन दादाजी सोनवणे (२६) हा जिल्हा शासकिय रुग्णालयात शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उपचारासाठी दाखल झाला होता. मद्यप्राशनाचे व्यसन असलेल्या या युवकाची शरीरयष्टी अत्यंत सडपातळ होती. त्याच्यावर उपचार सुरु होते; मात्र त्याने शनिवारी सायंकाळी येथील स्वच्छतागृहात जाऊन गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान, दुसरा रुग्ण स्वच्छतागृहात जात असताना त्याच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने तत्काळ कक्षातील परिचारिकांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. घटनेची माहिती मिळताच निवासी वैद्यकिय अधिकारी, सिव्हील पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. सचिनच्या मृतदेह खाली उतरवून घेत पोलिसांनी पंचनामा केला यानंतर रात्री उशिरापर्यंत  पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली जात होती. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. त्याने दिलेल्या नातेवाईकांच्या भ्रमणध्वनीक्रमांकावर रात्रीउशिरापर्यंत जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून संपर्क साधला जात होता; मात्र कुठल्याहीप्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूPoliceपोलिस