पांजरवाडी सरपंच सदस्य, ग्रामस्थांचे अमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 17:58 IST2019-02-26T17:57:49+5:302019-02-26T17:58:32+5:30
येवला : आॅक्टोबर महिन्यात गावातील जुनी सार्वजनिक विहीर काही लोकांनी रात्रीच्या वेळेस बुजविल्यानंतर कुठलीही कारवाई संबधितांवर न झाल्याने मंगळवारी (दि.२६) पांजरवाडीगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थानी पंचायत समिती कार्यालायसमोर अमरण उपोषणास सुरु वात केली आहे.

पंचायत समिती कार्यालयासमोर पांजरवाडी येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ अमरण उपोषणास बसलेले असताना.
येवला : आॅक्टोबर महिन्यात गावातील जुनी सार्वजनिक विहीर काही लोकांनी रात्रीच्या वेळेस बुजविल्यानंतर कुठलीही कारवाई संबधितांवर न झाल्याने मंगळवारी (दि.२६) पांजरवाडीगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थानी पंचायत समिती कार्यालायसमोर अमरण उपोषणास सुरु वात केली आहे.
पांजरवाडी येथील दगडाच्या बांधकामात जुन्या काळातील सार्वजनिक विहीर होती. सदर विहिरींवरून गावातील लोक पाणी वापरत होते. सदर विहिरीची साफसफाई करण्यात यावी सर्वांची मागणी असतांना अचानक ही विहीर रात्रीतून गावातील काही लोकांनी बुजविली. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधिक्षक, प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना पांजरवाडीचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी चौकशी करुन कारवाईची मागणी केली होती. त्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने सोमवारी सरपंच जन्याबाई गायकवाड, उपसरपंच मुक्ताबाई घोडेराव, सदस्य श्रीकांत आगवन, विरेश घोडेराव, जगन घोडेराव, शांताराम देवरे, अशोक घोडेराव, अशोक देवरे, बाळू देवरे, जिजाराम देवरे, सुरेश भगत, संजय आगवन, रावसाहेब देवरे, भागीनाथ गायकवाड, बाळू गांगुर्डे, संजय गांगुर्डे, भगवान घोडेराव, मच्छीन्द्र देवरे, उत्तम घोडेराव, रमेश देवरे, रामनाथ आगवन, एकनाथ देवरे, अंजना घोडेराव, रेणुका गांगुर्डे आदींसह ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत.
गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक अशोक आडसरे यांना दोन वेळेस निवेदन देऊन सदरची विहीर ही ग्रामपंचायतीची सार्वजनिक मालमत्ता असताना का बुजविण्यात आली? बुजविण्यापूर्वी ग्रामसभेची परवानगी घेतली होती का? याचा खुलासा करण्यासंदर्भात मागील महिन्यात कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर ग्रामसेवकाने कुठलीही कारवाई केली नाही. सोमवारी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला सुरु वात झाल्यानंतर प्रभारी सभापती रु पचंद भागवत, गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनात ग्रामसेवक अशोक आडसरे, उपोषणकर्ते सरपंच, सदस्य, विहीर बुजविणारे लोक यांची बैठक घेतली. त्यानंतर विहीर पुन्हा मोकळी करण्यासंदर्भात या बैठकीत एकमत झाले नाही.
गटविकास अधिकाºयांनी सरपंचाच्या नावाने विहीर ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून उकरून घ्यावा असे लेखी पत्र दिले, मात्र लेखी पत्रावर ग्रामसेवकाचे नाव नसल्याने उपोषणकर्त्यांनी हे पत्र घेतले नाही. ग्रामसेवकही यानंतर पंचायत समिती कार्यालयातून निघून गेल्याने उपोषणावर रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नव्हता.