शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

एसटी महामंडळातून तिकीट होणार हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:42 AM

एसटीची लालपरी म्हणून ज्याप्रमाणे बसची ओळख आहे. त्याप्रमाणेच एसटीच्या तिकिटाचीदेखील वेगळी ओळख आहे. आकड्यांच्या तिकिटापासून ते डिजिटल तिकिटापर्यंतचा प्रवास करणाऱ्या एसटीने आता पुढचे पाऊल टाकले आहे.

नाशिक : एसटीची लालपरी म्हणून ज्याप्रमाणे बसची ओळख आहे. त्याप्रमाणेच एसटीच्या तिकिटाचीदेखील वेगळी ओळख आहे. आकड्यांच्या तिकिटापासून ते डिजिटल तिकिटापर्यंतचा प्रवास करणाऱ्या एसटीने आता पुढचे पाऊल टाकले आहे. स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एसटीतून प्रवास करता येणार असल्याने काही दिवसात एसटीचे तिकीट हद्दपार होणार आहे. शनिवार (दि.१जून) पासून सदर कार्डसाठी नोंदणी केली जाणार आहे.  गेल्या ७१ वर्षांपासून प्रवाशांच्या सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने काळानुरूप आपल्या सुविधा आणि सेवांमध्ये बदल करून प्रवाशांना अधिक सुखकर सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेतच आता महामंडळाने प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड आणले आहे.  विविध प्रकारच्या प्रवासी सवलत घेणाºया प्रवाशांबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांनादेखील स्मार्ट कार्ड घेता येणार आहे. यासाठी त्यांना मोबाइलप्रमाणेच प्रवाशाला रिचार्ज मारावा लागणार असून, या कार्डच्या माध्यमातून तो कोणत्याही शहरातून आणि महामंडळाच्या कोणत्याही बसमधून प्रवास करू शकणार आहे. स्मार्ट कार्डमुळे सुट्ट्या पैशांचा निर्माण होणारा वाद टळणार आहेच शिवाय पैसे खिशात नसतील तेव्हा रिचार्ज केलेल्या कार्डच्या माध्यमातून त्याला प्रवास करणे सुलभ होणार आहे.सदर स्मार्ट कार्ड योजनेतील मोठे लाभार्थी हे विद्यार्थीच आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या स्मार्ट कार्डचे रजिस्ट्रेशन केले जाणार आहे. या योजनेत नाशिक विभागातील सर्व आगारांतील मुख्य बसस्थानकावर विद्यार्थ्यांसाठा स्मार्ट कार्ड प्रणालीची नोंदणी केली जाणार आहे. सदरची नोंदणी झाल्यानंतर स्मार्ट कार्ड १० ते १५ दिवसांत प्राप्त होणार आहे.नोंदणीकरण केलेल्या विद्यार्थ्यांनी पासची मागणी केल्यास त्या विद्यार्थ्यांस तात्पुरत्या स्वरूपाचा एक महिना मुदतीचा कागदी पास देण्यात येणार आहे. नवीन बसस्थानक, निमाणी, मालेगाव, मनमाड, सटाणा, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, लासलगाव, कळवण, पेठ, येवला आणि पिंपळगाव या आगारांमध्ये स्मार्ट कार्ड नोंदणी केली जाणार आहे.लवकरच प्री-पेड सेवाहीराज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या स्मार्ट कार्ड योजनेचा पुढचा टप्पा हा प्री-पेड कार्ड असणार आहे. यामध्ये प्रवाशाचे कार्ड हे त्याच्या बॅँक खात्याशी संलग्न केले जाणार आहे. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.४संबंधित प्रवासी हा सदर कार्ड कोणत्याही मार्गावर वापरू शकतो. कंडक्टरने कार्ड स्कॅन केल्यानंतर प्रवासी भाड्याची रक्कम संबंधिताच्या खात्यातून महामंडळाच्या खात्यात वर्ग होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक