Nashik Crime: नाशिक-चांदवड बसमध्ये शेजारच्या सीटवर असलेली अनोळखी महिला झोपलेली असताना एका तरुणाने तिचे आपल्या मोबाइलमध्ये फोटो घेतले. ही बाब अन्य प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या तरुणाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र पोलिसांनी त्याला केवळ समज देऊन सोडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
नाशिकहून चांदवडच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये एक तरुण एका महिलेच्या शेजारी बसला होता. ही महिला प्रवासात झोपी गेली, त्याचा गैरफायदा घेत या युवकाने आपल्या मोबाइलमध्ये सदर महिलेचे गळ्यात हात घालून फोटो काढले. हा प्रकार बसमधील इतर प्रवाशांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या युवकाला हटकले. तसेच महिलेलाही याची माहिती दिली. तो तरुण महिलेच्या ओळखीचाही नसल्याने प्रवासी व त्या महिलेने त्याला चोप दिला. त्यानंतर बस पोलीस स्टेशनला नेऊन तेथे या युवकाला पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले.
महिलेचे फोटो, व्हिडीओ मोबाइलमधून केले डिलीटसदर बस पोलिस ठाण्यात आणून सदर तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केले. हा तरुण सिडको (नाशिक) येथील असून पोलिसांनी तरुणाची व त्याच्या मोबाइलची तपासणी केली असता त्याच्या मोबाइलमधून महिलेचे व्हिडीओ, फोटो डिलिट केले. पोलिसांनी त्या तरुणावर प्रतिबंधकात्मक कारवाई करीत समज देऊन त्याला सोडून दिले.