मालेगाव : चोपडा येथून इगतपुरीकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करणाऱ्या योगेश जगन्नाथ जाधव (४६, रा. दत्त चौक, साई मंदिराजवळ, सिडको) या प्रवाशाचा मालेगावी मृत्यू झाला. धुळे येथून प्रवासी बसले. मालेगावी बसमध्ये तिकीट तपासणी करताना मागील बाकावर इसम बेशुद्धावस्थेत मिळून आला. तेथून बस शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. पोलिसांनी रुग्णवाहिका मागविली. डॉक्टरांनी योगेश जाधव यांना मृत घोषित केले. बसचालक एकनाथ बाजीराव पाटील (रा.वाडीशेवाळ, ता. पाचोरा) यांनी शहर पोलिसांत खबर दिली.
मालेगावी बसमध्ये नाशिकच्या प्रवाशाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 00:53 IST