पायी दिंडीत भाविकांचा सहभाग
By Admin | Updated: January 15, 2015 23:40 IST2015-01-15T23:40:05+5:302015-01-15T23:40:24+5:30
पायी दिंडीत भाविकांचा सहभाग

पायी दिंडीत भाविकांचा सहभाग
सिडको : येथील सावतानगर ते श्री क्षेत्र शिर्डी दरम्यान पायी दिंडीत शेकडो साईभक्तांनी सहभाग घेतला. मनपा विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर व नगरसेवक हर्षा बडगुजर यांनी दिंडीचे पूजन करून दिंडीस प्रारंभ करण्यात आला.
सिडको, सावतानगर येथील साई समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ व साई समर्थ कला व क्रीडामंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक सुधाकर बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते.
श्री क्षेत्र शिर्डीपर्यंत पायी दिंडी काढण्यात येते. या दिंडीत शेकडो साईभक्त सहभागी होतात. शुभारंभप्रसंगी माजी नगरसेवक दिलीप दातीर, दादाजी अहिरे, सुभाष गायधनी, बी. एल. श्रीवास्तव, नाना पाटील, पिंटू भामरे, हरिभाऊ आढाव, संतोष हारगोडे, धनंजय बुचडे, नाना निकम, पवन मटाले, गोपीनाथ सोनवणे, सागर शेलार, विठ्ठल शेलार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)