बागलाण तालुक्यातील कर्मचारी संपात सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 16:36 IST2018-08-07T16:35:19+5:302018-08-07T16:36:01+5:30
निवेदन : सर्व संघटनांकडून पाठिंबा

बागलाण तालुक्यातील कर्मचारी संपात सहभागी
औंदाणे: बागलाण तालुक्यातील सर्व शिक्षकसंघटना तसेच ग्रामसेवक,विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख ह्या संघटना एकत्र येऊन तिन दिवशीय राज्यव्यापी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभाग होऊन पाठिंबा देत असल्याचे निवेदन समन्वय समितीने तहसिलदार जे. पी. कुवर तसेच गटविकास अधिकारी महेश पाटील यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा,अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, बदली त्रुटी दूर कराव्यात, पाच दिवसांचा आठवडा करावा, अशैक्षणिक कामे रद्द करावीत,रिक्त पदे भरावीत, महिलांना संगोपन रजा दयावी आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यावेळी शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष रवि थोरात, रवि गोलाईत,अधक्ष अरूण कापडणीस, सरचिटणीस देवा पवार, कार्याधक्ष दिपक सोनवणे,शरद भामरे, दिलीप भामरे,सुरेश पगार,राकेश बोरसे,आदींसह कर्मचारी उपस्थित होते.